आटपाडी डाळिंब उत्पादकात तीव्र असंतोष 

आटपाडी डाळिंब उत्पादकात तीव्र असंतोष 

आटपाडी - एक्सपोर्ट डाळिंब तयार झालेली असताना मोजक्याच असलेल्या एक्सपोर्टच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत चाळीस टक्यांनी दर कमी केले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत पन्नास रुपये दर कमी आहेत. एक्सपोर्टचे व्यापारी राजरोस डाळिंब उत्पादकांना लुटत आहेत. या प्रकारामुळे डाळिंब उत्पादकात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.        

आटपाडी तालुका दर्जेदार डाळिंब उत्पादन निर्मिती करण्यात आघाडीवर आहे. स्थानिक बाजारपेठेत चालणारया डाळिंबाची निर्मिती केली जात होती. अलीकडे डाळिंबाचे क्षेत्र आणि उत्पादनही वाढत गेले. त्यामुळे दर कोसळले. गेल्या चार वर्षात डाळिंबाचे दर 20 ते 40 टक्केनी कमी झालेत. यावर शेतकऱ्यांनी युरोप एक्सपोर्ट निर्मितीचा उपाय शोधला. मोजकेच शेतकरी एक्सपोर्ट डाळिंबाचे उत्पादन घेत होते. या डाळिंबांना डिसेंबरमध्ये 120 रुपये तर जानेवारी आणि फेब्रुवारीत एकशे चाळीस ते साठ रुपये प्रति किलो भाव मिळत होता. दरवर्षी एक्‍स्पोर्टचे भाव वाढतच गेले आहेत. हंगामाचा शेवट उच्चांकी दराने होत होता. त्यामुळे युरोप निर्मितीकडे शेतकरी मोठ्या संख्येने वळले. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एक्सपोर्टचा टक्का वाढत गेला. एक्सपोर्टचे एक ते दोनच व्यापारी होते. उत्पादन वाढत गेले. तुलनेत व्यापारी वाढत गेले नाहीत. सध्या बोटावर मोजण्याएवढेच चार ते पाच व्यापारी आहेत. त्यांना सहज एक्स्पोर्टचा माल मिळत आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांनी संगनमत करून एक्सपोर्टचे दर पाडले. 

यावर्षी हंगामाची सुरुवात प्रति किलो 120 रुपये भावाने केली होती. त्यानंतर दर न वाढता व्यापाऱ्यांनी संगणमत करून 100 आणि सध्या 80 रुपये प्रति किलो वर आणले. दुसरीकडे लोकलचे भाव चाळीस वरून साठ रुपयावर पोहोचलेत. लोकलचे दर वाढत असताना एक्स्पोर्ट चे दर मात्र व्यापाऱ्यांनी पाडले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादकात असंतोष निर्माण झाला आहे. या व्यापाऱ्यांना जिल्हा ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या शेतकऱ्यांनी जाब विचारला मात्र हे व्यापारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. यातूनच एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी एका एक्सपोर्ट व्यापाऱ्याला तालुक्यातून पळवून लावले. याकडे पणन मंडळ आणि शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शासनानेच एक्‍स्पोर्ट डाळींबाचे भाव ठरवावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्यावर्षी 15 जानेवारीला 140 रुपये एक्स्पोर्टचा भाव आता व्यापाऱ्यांनी संगणमत करून 80 रुपयांवर आणला आहे. एक्सपोर्टर उत्पादकांना लूटत आहेत.
- जितेंद्र गिड्डे  (शेतकरी तडवळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com