लग्न मंडपात दुर्ग संवर्धनासाठी धनादेशांचे वितरण...! 

संदीप खांडेकर
शुक्रवार, 19 मे 2017

कोल्हापूर - लग्न म्हटले, की पै-पाहुणे, सगेसोयरे यांची सरबराई करण्याची चिंताच अधिक. हा रूसला, तो फुगला असे पाहत सांभाळायचे कुणाला, हा प्रश्‍न तर डोकेदुखीचा. लग्न कार्यात अमाप पैसा खर्च करण्याचे तर नवेच फॅड. असे असताना एखाद्या दुर्गवेड्याने लग्न कार्यात दुर्ग संवर्धन उपक्रमासाठी दिली, तर अनेकांचे डोळे विस्फारतीलही. मात्र, हे घडले आहे तेही विनोद पोखरकर (रा. साखरमेळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) या दुर्गवेड्याच्या लग्न कार्यात. त्याने लग्न मंडपात आज (ता. 18) राज्यातील पाच दुर्ग संवर्धन संस्थांना प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश देत दुर्गांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त केली. 

सह्याद्री प्रतिष्ठानचा (महाराष्ट्र) विनोद हा कार्यकर्ता.गेली चार वर्षे तो प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमात सहभागी होतो.दुर्गांवर जावे, तेथील इतिहास समजून घ्यावा आणि दुर्गांची स्वच्छता करावी, हा तर त्यांचा आवडता धंद. तो बी.ई. सिव्हील इंजिनियर असल्याने दुर्गांची बांधणीबद्दल तर त्याला भलतेच अप्रुप आहे. तसेच राज्यातील ढासळणाऱ्या दुर्गांची त्याला खंत आहे. घारगाव (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) येथील अभिलाषा यांच्याशी लग्न ठरल्यानंतर त्याने लग्न कार्यात दुर्गांच्या संवर्धनासाठी आर्थिक मदत संस्थांना द्यायचे,असे निश्‍चित केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी त्याला प्रोत्साहन दिले. पोखरकर कुटुंबीयांना मुलाचा हा निर्णय कौतुकास्पद तर वाटलाच, शिवाय त्यांनीही त्याला पाठबळ दिले. 

या निर्णयानंतर श्री. गोजमगुंडे यांनी राज्यातील दुर्ग संवर्धनावर काम करणाऱ्या पाच संस्थांची माहिती घेतली.या संस्थांना त्यांनी प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश लग्न मंडपात देण्याचे जाहीर केले. तसेच शिर्डी येथे उभारण्यात येणाऱ्या शिवश्रमाला पंचवीस हजार रूपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज लग्न मंडपातच धनादेशांचे पाच दुर्ग संवर्धन संस्थांना धनादेशाचे वाटप झाले. याबाबत श्री. गोजमगुंडे म्हणाले, ""पोखरकर कुटुंबीयांचा निर्णय दुर्ग संवर्धन चळवळीला बळकटी देणारा आहे. राज्यातील दुर्ग ढासळत असताना त्यांच्या संवर्धनासाठी असे पाऊल प्रत्येकाने उचलणे आवश्‍यक आहे.'' संपर्क प्रमुख गौरव शेवाळे म्हणाले, ""विनोद हा आमचा कार्यकर्ता आहे. आमच्या संस्थेचा घटक असल्याने त्याच्या निर्णयाचा आम्हाला अभिमान वाटतो.'' 

75 हजाराच्या धनादेशाचं वितरण 
लग्न मंडपात दुर्गवीर प्रतिष्ठान शिवदुर्ग संवर्धन, शिवाजी रायगड स्मारक मंडळ, शिवदुर्ग मित्र संस्थेला प्रत्येकी दहा हजार रूपयांचे धनादेश देण्यात आले. कोल्हापूरच्या शिवशक्ती प्रतिष्ठानचाही यात समावेश होता. विनोद व अभिलाषा यांच्याकडून शिवशक्ती प्रतिष्ठानच्या संदीप पाडळकर यांनी धनादेश स्वीकारला. मंडपात एकूण 75 हजार रूपयांचे धनादेशाद्वारे वितरण झाले. 

Web Title: Distribution of checks to the fort for the fortress