मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात पूरग्रस्तांना साहित्य वाटपामुळे दिलासा

आश्पाक बागवान 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

बेगमपुर : भीमा नदीला आलेल्या पुराने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे त्या बेघर झालेल्या कुटूंबाची चूल देखील पेटली नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी मंगळवेढ्यासह तीन तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पदर खोचला आहे. त्यांनी अन्नासाठी लागणारे साहित्याचे वाटप करून दिलासा देण्याय्रा एकमेव महिला लोकप्रतिनिधी ठरल्या.

प्रसंगी पाण्यातून मार्ग काढून पुरग्रस्त गावाला भेट देण्यातही आग्रही ठरल्या तालुक्यातील उचेठाण, बठाण, माचणूर ,रहाटेवाडी, तांडोर, सिद्धापूर, अरळी, तामदर्डी या पूरग्रस्त गावातील पाण्यामुळे  बेघर झालेल्या कुटूंबाला जलसंधारण मंत्री ना. तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार  प्रत्यक्ष भेट त्यांना दिली. तर आटा,तांदुळ,तेल, यासह  जेवणाचे दोन दिवस पुरेल इतके साहित्याचे वाटप सुरू केले. सध्या तीन गावात वाटप झाले असून पाचशे कुटूंबाला वाटपाची प्रक्रिया सुरूच आहे. त्यांनी मंगळवेढ्याबरोबर पंढरपूर आणि मोहोळ येथील पूरग्रस्त नागरिकांना देखील ते साहित्य भेट दिले.

पूरग्रस्ताना तात्काळ मदत नाश्ता,चहा,काळजीचे वाटप करून दिलासा दिला. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात, घरात पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले, त्यांचे पंचनामे त्वरित सुरू करण्याबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना विनंती केली आहे. 

पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरण्याची मोठी भीती असते त्यामुळे मुबलक प्रमाणात त्यांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. याबाबतीतही प्रशासनाला विनंती केली आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे तालुका समन्वयक श्रीशैल कुंभार शहर समन्वयक नारायण गोवे उपतालुका प्रमुख अरुण मोरे उपशहर प्रमुख महेश इंगळे शिवसेनेचे शाखाप्रमुख शिवसैनिक उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: distribution to flood victims in three talukas including mangalwedha