महेश नवमीनिमित्त गुलाब सरबताचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

अक्कलकोट महिला माहेश्वरी मंडळातर्फे महेश नवमीच्या पावन दीना प्रित्यर्थ गुलाब सरबत वितरण कार्यक्रम श्री स्वामी महाराज मंदिर व बसस्थानक परिसरात संपन्न झाला. महेश नवमी या पावन दिवसाच्या औचित्याने संपूर्ण भारतभरातून एकाच दिवशी एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणी दहा कोटी ग्लास गुलाब सरबत वितरण कार्यक्रमाचे नियोजन संपूर्ण माहेश्वरी बंधू भगिनी तर्फे करण्यात आले होते.

अक्कलकोट - अक्कलकोट महिला माहेश्वरी मंडळातर्फे महेश नवमीच्या पावन दीना प्रित्यर्थ गुलाब सरबत वितरण कार्यक्रम श्री स्वामी महाराज मंदिर व बसस्थानक परिसरात संपन्न झाला. महेश नवमी या पावन दिवसाच्या औचित्याने संपूर्ण भारतभरातून एकाच दिवशी एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणी दहा कोटी ग्लास गुलाब सरबत वितरण कार्यक्रमाचे नियोजन संपूर्ण माहेश्वरी बंधू भगिनी तर्फे करण्यात आले होते.

अक्कलकोट महिला माहेश्वरी मंडळातर्फे अक्कलकोट मध्ये हा गुलाब सरबत वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत मंडळातर्फे एक हजार पाचशे ग्लास सरबत यात्रेकरू, प्रवासी व स्वामीभक्तांना वितरीत करण्यात आले आहे. प्रथमतः स्वामी मंदिरातील शिवलिंगावर रुद्राभिषेक, बिल्वद्लअर्चन, महापूजा व आरती माहेश्वरी बंधू भगिनींनी केली.

या कार्यक्रमाचे उदघाटन माहेश्वरी समाजाचे जेष्ठ सदस्य श्री प्रकाशचंद्र जाजु व जेष्ठ सदस्या श्रीमती शांताबाई राठी यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्कलकोट महिला माहेश्वरी मंडळाच्या अध्यक्षा सोनल जाजु, पूनम राठी, बसंती जाजु, संगीता जाजु, उषा मानधाने, कौशल्या जाजु, स्नेहा राठी, चंचल जाजु, राधिका तोतला, डॉ मीना तोतला आदिनी परीश्रम घेतले.

Web Title: Distribution of Gulab Sarbat on Mahesh Navami