पंचायत समिती शिक्षण विभागास होणार साहित्य वाटप

सनी सोनावळे
बुधवार, 13 जून 2018

टाकळी ढोकेश्वर (नगर) : पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या वतीने दरवर्षी एक सामाजिक उपक्रम राबविला जातो या वर्षी पंचायत समिती शिक्षण विभागास वॉटर प्युरीफायर, दोन पाणी टाक्या, फ्लोअर मॅट, झाडांसाठी कुंड्या यांसह अन्य साहित्य शनिवार (ता.16) रोजी पारनेर पंचायत समिती सभागृहात आमदार विजय औटी यांच्या उपस्थितीत व सभापती राहुल झावरे यांच्या अध्यक्षतेखाली देणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रविण ठुबे यांनी दिली.

ठुबे म्हणाले, संघाच्या वतीने दरवर्षी हा सामाजिक उपक्रम घेतला जातो मागील वर्षी तालुक्यातील आदिवासी विभागातील गाजदीपूर येथील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानुसार शिक्षण मिळावे याकरीता जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आली. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना व केंद्रप्रमख यांना वेळोवेळी पंचायत समिती शिक्षण विभागात कामानिमित्ताने यावे लागते तसेच शिक्षण विभागातील सर्वच कर्मचारी यांच्या मागणीचा विचार करून यावर्षी हे साहित्य पंचायत समिती शिक्षण विभागास देण्यात येणार आहे.याप्रसंगी वृक्षारोपण व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा गौरव देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपसभापती दिपक पवार, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, गटशिक्षणाधिकारी संभाजी झावरे,शिक्षक बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहकले व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार असल्याची माहीती संघाचे सरचिटणीस बाळासाहेब दिघे यांनी दिली.

Web Title: Distribution of material to panchayat samiti education dept