जयंतराव आज मौन सोडणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सांगली - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या कारभाराविरोधात बंड पुकारलेले राष्ट्रवादीचे नऊ संचालक शुक्रवारी (ता.२४) आमदार जयंत पाटील यांना भेटणार आहेत. श्री. पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी संचालकांचे बंड थोपवले होते. परंतु त्यानंतरही अध्यक्ष बदलाबाबत निर्णय न घेतल्यामुळे संचालकांनी श्री. पाटील यांना धक्का दिला आहे. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीत श्री. पाटील यांनी मौन सोडून  कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी तीन वर्षांचा कालावधी नुकतेच पूर्ण केला आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांना बदलाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. तशातच जिल्हा बॅंकेतील मेगा भरतीमध्ये घोडेबाजारासाठीही काही इच्छुक असल्याची चर्चा आहे. परंतु नोकर भरतीबाबत अध्यक्ष पाटील यांच्याकडून  निर्णय घेतला जात नसल्यामुळे संचालकांच्या नाराजीत  भर पडली आहे. श्री दत्त इंडियाला वसंतदादा शेतकरी साखर कारखाना चालवायला देण्याच्या करारावरूनही वातावरण तापले आहे. त्याचे पडसाद मंगळवारी उमटले.

जयंत पाटील  यांनी राष्ट्रवादीची राज्य कार्यकारिणी मंगळवारी जाहीर केली. त्यामध्ये दिलीप पाटील यांची राज्य सरचिटणीसपदी निवड केली. त्यानंतर त्यांचा परदेश दौऱ्याचा मुहूर्त साधून १३ संचालकांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सात, काँग्रेसचे चार आणि भाजपचे दोन संचालकांचा समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी संचालकांनी बंड पुकारल्यानंतर जयंत पाटील यांनी ते थोपवले होते. योग्यवेळी अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिले. परंतु १३ संचालकांनी वाट पाहून पुन्हा जोरदार बंड पुकारले आहे. त्यामुळे श्री. पाटील यांना ठोस निर्णय घेणे भाग आहे. नऊ संचालक श्री. पाटील यांना शुक्रवारी  सायंकाळी आष्टा येथे भेटणार आहेत. त्यामुळे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या अनुपस्थितीत श्री. पाटील कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: District bank Issue Jayant Patil Politics