जिल्हा बॅंकांची नोकरभरती आता ऑनलाइनच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

सोलापूर - राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत होणारी नोकरभरती यापुढे फक्त ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा आदेश राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे. "नाबार्ड'च्या राज्यस्तरीय कार्यबलाने नियुक्त केलेल्या उपसमितीचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. या अहवालानुसार आता राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची नोकरभरती त्रयस्थ संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा आदेश दिला आहे.

यापूर्वी राज्यातील काही बॅंकांनी ऑफलाइन पद्धतीने नोकरभरती परीक्षा घेतली होती. या परीक्षेत हस्तक्षेप होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता राज्यातील सर्वच जिल्हा बॅंकांसाठी त्रयस्थ संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा सक्तीची केली आहे. राज्यातील सर्व बॅंकांनी आपला सेवक कमांड निश्‍चित करून त्यास सहकार आयुक्त कार्यालयाची मान्यता घेणे आवश्‍यक आहे. त्रयस्थ संस्थेने परीक्षेत गडबड केल्यास त्या संस्थेवर कारवाई करण्याची प्राथमिक जबाबदारी ही बॅंकेवरच असणार आहे.

नियमांचे पालन न केल्यास संबंधित बॅंकेवर महाराष्ट्र सहकार कायद्यान्वये कार्यवाही करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.

Web Title: district bank recruitment online