जिल्हा बार असोसिएशनच्या १५ जागांसाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

कोल्हापूर - जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवसह १५ जागांसाठी उद्या (ता. १५) मतदान होणार आहे. तीन पॅनेलमध्ये ही लढत होत आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज असून सकाळी १० ते सायकांळी पाच या वेळेत मतदान होईल. सायंकाळी मतमोजणीनंतर रात्री उशिरा निकाल जाहीर होणार आहे. हरकत घेतलेल्या ४४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे निवडणूक निर्णयाधिकारी ॲड. सुभाष पिसाळ यांनी सांगितले. 

कोल्हापूर - जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवसह १५ जागांसाठी उद्या (ता. १५) मतदान होणार आहे. तीन पॅनेलमध्ये ही लढत होत आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज असून सकाळी १० ते सायकांळी पाच या वेळेत मतदान होईल. सायंकाळी मतमोजणीनंतर रात्री उशिरा निकाल जाहीर होणार आहे. हरकत घेतलेल्या ४४ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे निवडणूक निर्णयाधिकारी ॲड. सुभाष पिसाळ यांनी सांगितले. 

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिवासह विविध १५ पदांसाठी निवडणूक रिंगणात ४२ उमेदवार आहेत. ॲड. प्रशांत चिटणीस, ॲड. संपतराव पवार पुरस्कृत ॲड. प्रकाश देशमुख-आंबेकर आणि ॲड. प्रशांत देसाई यांचे पॅनेल आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने उमेदरावांकडून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतील वकिलांशी मोबाईलवरून संपर्क साधत प्रचार सुरू होता. दरम्यान, मतदार यादीतील सीमा भागातील ४४ मतदारांबाबत हरकती नोंदविल्या होत्या. त्यांची नावे बेळगाव बार असोसिएशनमध्ये समाविष्ट असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे ॲड. पिसाळ यांनी स्पष्ट केले. निवडणुकीसाठी न्याय संकुलातील हॉल क्रमांक एकमध्ये ३० बूथ उभारले आहेत. त्यासाठी ३५ जणांची टीम केंद्रावर तैनात आहे.

ॲड. प्रशांत चिटणीस पॅनेलचे उमेदवार (कंसात पद) -
ॲड. प्रशांत चिटणीस (अध्यक्ष), ॲड. आनंदराव जाधव (उपाध्यक्ष), ॲड. सुशांत गुडाळकर (सचिव), ॲड. तेहजीज नदाफ (सह-सचिव), ॲड. धैर्यशील पवार (लोकल ऑडिटर), ॲड. पूजा देशमुख (महिला प्रतिनिधी), सदस्य - ॲड. जयदीप कदम, ॲड. सदाशिव जंगम, ॲड. स्वाती तानवडे, ॲड. अभिषेक देवरे, ॲड. ओंकार देशपांडे, ॲड. अविनाश पाटील, ॲड. संजय मुळे, ॲड. युवराज शेळके, ॲड. विद्याधर शेलार. 

ॲड. प्रकाश देशमुख-आंबेकर पॅनेल -
ॲड. प्रकाश देशमुख-आंबेकर (अध्यक्ष), ॲड. सयाजीराजे कदम (उपाध्यक्ष), ॲड. नाथ पाटील (सचिव), ॲड. सुरेश कदम (सह-सचिव), ॲड. माणिक शिंदे (लोकल ऑडिटर), ॲड. डॉ. भाग्यश्री कुलकर्णी (महिला प्रतिनिधी), सदस्य - ॲड. गौरव जवळकर, ॲड. कौस्तुभ रोटे, ॲड. निखिल वारंगे, ॲड. अभिजित बच्चे-पाटील. 

ॲड. प्रशांत देसाई पॅनेल -
ॲड. प्रशांत देसाई (अध्यक्ष), ॲड. दत्तात्रय जाधव (उपाध्यक्ष), ॲड. महेशकुमार जाधव (सचिव), ॲड. अमोल कुलकर्णी (सह-सचिव), ॲड. ऋतुराज देशमुख-पाटील (लोकल ऑडिटर), ॲड. मनीषा पाटील (महिला प्रतिनिधी), सदस्य ः ॲड. रणजित गुरव, ॲड. अमोल नाईक, ॲड. भरत पाटील, ॲड. दीपाली पोवार, ॲड. कृष्णात माने, ॲड. विनायक म्हांगोरे, ॲड. अरुण शिंदे, ॲड. सुरेश शिंदे, ॲड. संग्राम शिंर्के.

दृष्टिक्षेपात निवडणूक
जागा    १५
पॅनेल    ३
उमेदवार    ४२
मतदार    २४०६

Web Title: district bar association election