जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये सव्वा दोन कोटींचा अपहार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

कऱ्हाड - सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या म्हासोली शाखेतील व्यवस्थापक व कॅशियरने तीन वर्षांत सुमारे दोन कोटी 28 लाख 34 हजारांचा अपहार करून खातेदारांची रक्कम हडप केली. त्याबाबत बॅंकेचे सरव्यवस्थापक संजयकुमार जाधव यांनी तक्रार दिली आहे. प्रमोद चंद्रोजी पाटील (रा. उंडाळे) व निवृत्ती बबन भालेराव (रा. बनवडी) अशी संशयितांची नावे आहेत. भालेराव व्यवस्थापक, तर पाटील कॅशियर आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना बॅंकेने निलंबित केले आहे. 

पोलिसांची माहिती अशी - म्हासोली शाखेत दररोज पैसे भरण्यासाठी येणाऱ्या खातेदारांच्या रक्कमा या दोघांनी परस्पर फिरवल्या आहेत. प्रत्यक्ष खातेदार पैसे काढण्यासाठी आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर बॅंकेने शाखेतील सर्व खातेदारांची खाती तपासली. त्या वेळी दोघांनी केलेल्या अपहाराची माहिती समोर आली. त्यानंतर त्या दोघानांही निलंबित करण्यात आले आहे. दोघांनाही सर्वसाधरण 100 ते 125 खातेदारांच्या खात्यातील रकमेची फिरवाफिरवी केली आहे. 14 सप्टेंबर 2013 ते 29 सप्टेंबर 2016 या कालावधीत त्यांनी प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरव्यवस्थापक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील व भालेराव यांना सगळ्या खातेदारांची माहिती होती. त्यांचे व्यवहार व त्या खातेदारांचे ऑनलाइन कोडची माहिती होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परस्परच रक्कम काढून त्याचा अपहार केला. जो खातेदार पैसे भरत होता. त्याची रक्कम दुसऱ्याच दिवशी काढली जात असे. या पैशाची परस्पर विलेहवाट लावली जात होती. त्यानंतर ते पैसे त्यांनी वापरलेल्या कालवधीतील व्याजासह भरले जात होते. त्यासाठी दुसऱ्या खातेदाराच्या खात्यातील पैसे काढले जात होते. दुसऱ्या खातेदारची रक्कम फिरवून पहिल्याचे पैसे ते भागवले जात होते. त्यामुळे हा प्रकार तितकासा कोणाच्या लक्षात येत नव्हता. मात्र काही वेळा प्रत्यक्ष खातेदार पैसे काढण्यासाठी आल्यानंतर तो प्रकार लक्षात येऊ लागला. बॅंकेतही त्याची चर्चा झाली. त्यानंतर बॅंकेच्याही लक्षात घोटाळा होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बॅंकेने त्या तीन वर्षांतील सर्व व्यवहार तपासले आहेत. त्यानुसार त्या दोघांनाही मिळून दोन कोटी 24 लाख 32 हजारांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अपहाराची रक्कम संपत्तीत गुंतवली? 
जिल्हा बॅंक अपहार प्रकरणातील संशयित पाटील, भालेराव यांनी कमावलेल्या पैशातून अनेक ठिकाणी संपत्ती घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार त्या संपत्ती सील करून जप्त करण्याची कार्यवाही होईल, असे सांगण्यात आले. त्या दोघांनी अनेक ठिकाणी जमिनीत गुंतवणूक केली आहे, त्याचाही शोध सुरू आहे. 

Web Title: District Central Bank two crore embezzlement

टॅग्स