esakal | या पाच नव्या शिवभोजन केंद्रांना मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

District Collector approves five new centers

शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर असलेल्या पाच केंद्रांत 700 थाळ्या दिल्या जातात. मात्र, निश्‍चित वेळेच्या आधीच त्या संपत असल्याने, अनेक गरजूंना त्याचा लाभ मिळत नव्हता. प्रत्येक गरजूला शिवभोजन मिळावे, यासाठी विविध आस्थापनांतर्फे शिवभोजन केंद्रांवर नियमित तपासणी सुरू आहे.

या पाच नव्या शिवभोजन केंद्रांना मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः अल्प दरात सुरू केलेल्या पाच केंद्रांतील शिवभोजनापासून अनेक गरजू वंचित राहत असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात येताच, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आणखी पाच केंद्रांना नव्याने मंजुरी दिली. त्यासाठी आणखी 700 थाळ्यांच्या वाढीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला. पुढील आठवड्यात सरकारचा "ग्रीन सिग्नल' मिळताच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाढीव ७०० थाळ्या मिळणार
शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर असलेल्या पाच केंद्रांत 700 थाळ्या दिल्या जातात. मात्र, निश्‍चित वेळेच्या आधीच त्या संपत असल्याने, अनेक गरजूंना त्याचा लाभ मिळत नव्हता. प्रत्येक गरजूला शिवभोजन मिळावे, यासाठी विविध आस्थापनांतर्फे शिवभोजन केंद्रांवर नियमित तपासणी सुरू आहे. मागील आठवड्यापासून नवीन केंद्रांचा शोध सुरू होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच केंद्रांना नव्याने मंजुरी दिली. त्यामुळे शिवभोजन केंद्रांची संख्या आता दहा, तर थाळ्यांची संख्या 1400 होणार आहे. 


नव्याने मंजूर केलेली प्रस्तावित केंद्रे 

रेव्हेन्यू कॅंटीन (जिल्हाधिकारी कार्यालय) 
हॉटेल संस्कृती (कोंड्यामामा चौक) 
बळिराजा भोजनालय (चौपाटी कारंजा) 
तिवारी भोजनालय (नगर तहसीलसमोर) 
स्वामी समर्थ स्नॅक बार (स्वस्तिक बसस्थानक) 

loading image