जिल्हाधिकारी हातात खोरे घेतात तेव्हा...

अक्षय गुंड 
Monday, 13 January 2020

मुळचे सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रूक येथील रहिवासी असलेले व सध्या श्रीगंगानगर येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते हे आपल्या पथका समवेत या भागाची पाहणी करत असताना. रस्त्याच्या कडेला एक शेतकरी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असल्याचे निदर्शनास आले.

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी पथकासमवेत जात असताना, जिल्हाधिकारी एका शेतकऱ्यास पिकास पाणी देताना पाहतात, अन् शेतकरी कुटुंबात जन्मलेले हे जिल्हाधिकरी स्वतः त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकर्यांच्या हातातील फावडे घेतात तेंव्हा.. राजस्थान राज्यातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील ही घटना. पाण्यापासून वंचित असलेला व दुष्काळी पट्टा म्हणुन या जिल्ह्याची ओळख आहे. अन् त्यामुळे कायमस्वरूपी येथील शेतकरी अंदोलनाच्या भुमिकेत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाची दमछाक होते. सध्या या जिल्ह्यातील अनुपगढ या भागातील शेतातवर टिड्डी रोगाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे या भागातील शेतकरऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. टिड्डी हा किटक असुन तो पाकिस्तानातुन मोठ्या प्रमाणावर या भागात येतो. सकाळी सूर्यादयापासुन सुर्यास्तापर्यंत शेतकऱ्यांच्या पिकांवर बसुन पिकांचे नुकसान करतो. त्यामुळे या भागातील शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाले आहेत. त्यासाठी या किटक रोगाचा नायनाट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष वेधले आहे. 

हेही वाचा- राष्ट्रवादीला संधी सोलापूरकारांच्या जवळ जाण्याची
नकाते उपाळईचे

मुळचे सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रूक येथील रहिवासी असलेले व सध्या श्रीगंगानगर येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते हे आपल्या पथका समवेत या भागाची पाहणी करत असताना. रस्त्याच्या कडेला एक शेतकरी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी धडपड करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने आपल्या गाड्यांचा ताफा त्या शेतकऱ्याच्या शेताच्या दिशेने वळवला. कारण टिड्डी किटकांचा पिकांवर प्रादुर्भाव सुरू असताना देखील शेतकऱ्याची पिकास पाणी देण्यासाठी सुरू असलेली लगबग बघुन त्यांनी मदत केली. माढा तालुक्यातील उपळाईसारख्या दुष्काळी भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवप्रसाद नकाते यांना आयएएस अधिकारी होण्यापुर्वीचा काळ आठवला. त्यांनी देखील शालेय वयात शेतात पिकांना अशाच प्रकारे पाणी दिले होते. त्यामुळे शेतकऱ्याप्रती त्यांची भुमिका कायम संवदेनशील आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा व शेतकरी व प्रशासन यामधील दुरी कमी व्हावी व प्रशासनाबद्दल सर्वांच्या मनात आत्मियता निर्माण व्हावी या उद्देशाने, जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते यांनी पदाचा कोणताही गर्व न बाळगता शेतकऱ्यांच्या बांधावरील पाण्यात उतरले.
हेही वाचा- ‘या’ नगरसेवकाची करणी; नियोजनावर पाणी
शेतकऱ्याकडून घोषणा

चक्क जिल्हाधिकारी पाण्यात उतरून हातात फावडे घेऊन पाणी देत असल्याचे पाहुन त्या शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याक्षणी शेतकऱ्याने 'जय जवान जय किसान', भारत माता कि जय अशा घोषणा देण्यास सुरू केल्या. यातुन जिल्हाधिकारी शिवप्रसाद नकाते यांची शेतकऱ्याप्रती असलेली संवदेनशीलता दिसुन आली. त्यामुळे त्यांची तेथे 'शेतकरी जिल्हाधिकारी' अशी ओळख होऊ लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The District Collector helps out in the field