जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार - चंद्रकांत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष स्वबळावर व पक्ष चिन्हावर लढणार आहे. कोणाशी आघाडी न करता सर्व जागा ताकदीने लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष स्वबळावर व पक्ष चिन्हावर लढणार आहे. कोणाशी आघाडी न करता सर्व जागा ताकदीने लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्या वेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अतुल भोसले, दीपक पवार, महेश शिंदे, ऍड. भरत पाटील, सुशांत निंबाळकर, सह्याद्री कदम, डॉ. दिलीप येळगावकर, अविनाश फरांदे, अनुप सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी मंत्री पाटील यांनी गट, गणनिहाय पक्षाची नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. त्यासाठी तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी त्यांनी वाटून दिली. त्यामध्ये कऱ्हाड- अतुल भोसले, पाटण- ऍड. भरत पाटील, सातारा- दीपक पवार, कोरेगाव- महेश शिंदे व संतोष जाधव, वाई- अविनाश फरांदे, फलटण- सह्याद्री कदम व सुशांत निंबाळकर, माण- खटाव- डॉ. दिलीप येळगावकर, खंडाळा- अनुप सूर्यवंशी आदींना तालुकानिहाय जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक गट व गणांतील निवडणूक ताकदीने लढण्याची सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली.

Web Title: District Council elections the BJP will fight on its own