जिल्हा बॅंकेची नाबार्डकडून पुन्हा केवायसी तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 एप्रिल 2017

सांगली - राज्यातील बहुतांश सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांतील सर्व खातेदारांची केवायसी तपासणी करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने नाबार्डला दिले आहेत. नाबार्डचे पथक तपासणीसाठी सांगलीत सहा एप्रिलला येणार आहे. नोटाबंदीच्या काळात ५००, १००० रुपयांच्या नोटा भरणाऱ्या सर्व खात्यांचीही तपासणी केली जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे, हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या. जिल्हा बॅंकांत या काळात १० ते १३ नोव्हेंबर काळात जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या. मात्र  त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने जुन्या नोटा भरून घेण्यावर निर्बंध आणले. नोटाबंदी कालावधीत चलन पुरवठा नसल्याने जिल्हा बॅंकांचे काम ठप्प होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा बॅंकेच्या सर्वाधिक २१७ शाखा आहेत. शेतकरी, मजूर या बॅंकेशी आर्थिक व्यवहाराने जोडले आहेत. जिल्हा बॅंकेत चार दिवसांत ३१५ कोटी जमा झाले. 

जुन्या नोटा बॅंकेत मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या. त्या भरून न घेण्याच्या आदेशानंतर राज्यभरातून सहकारात नाराजी पसरली. काळा पैसा पांढरा करण्यासाठीच या बॅंकांचा वापर होत असल्याचे सत्ताधारी भाजपची धारणा झाली होती. राज्यभरातील या बॅंकांच्या आंदोलनानंतर नाबार्ड, प्राप्तीकर आणि ईडीने बॅंकेवर छापा टाकून तपासणी केली होती. 
जिल्हा बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेने जुन्या नोटा भरून घ्यावात, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरकारने केवायसी तपासून रक्कम भरून घेण्याचे मान्य केले आहे. मात्र तीन महिन्यांनंतरही त्याला मुहूर्त लागला नाही. 

Web Title: District NABARD Bank KYC check again