राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा निवड समिती गठीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

केंद्र शासनाने शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिक्षकांनी ऑनलाइन माहिती भरली आहे. ही भरलेली ऑनलाइन माहिती पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर - 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची नियुक्ती शासनाने केली आहे. या समितीने जिल्ह्यातून तीन शिक्षकांनी नामांकने 24 जुलैपर्यंत राज्य निवड समितीकडे ऑनलाइन पाठवायची आहेत. 

केंद्र शासनाने शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी त्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिक्षकांनी ऑनलाइन माहिती भरली आहे. ही भरलेली ऑनलाइन माहिती पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी त्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्था यांचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी व जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले एक शिक्षणतज्ञ हे या समितीचे सदस्य असतील. मुंबईसाठी शिक्षण निरीक्षक हे त्या समितीचे अध्यक्ष असतील. ऑनलाइन माहितीच्या संदर्भात माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पासवर्ड घ्यायचे आहेत. ही सर्व माहिती गुप्तपणे ऑनलाइनच्या माध्यमातून राज्यस्तरीय निवड समितीकडे 24 जुलैपर्यंत पाठवायची आहे. 

वशिलेबाजीला बसला चाप -
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांनी ऑनलाइन माहिती भरण्याची नवी पद्धत सुरु करून वशिलेबाजीला चाप लावण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. जे पात्र उमेदवार असतील त्यांचीच निवड राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी होणार आहे. त्यामुळे यात पारदर्शकता आली असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त केली जात आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: District Selection Committee constitutes for National Teacher Award