संगमनेरातील 94 ग्रामपंचायतींची अशी आहे प्रभाग रचना 

This is the division structure of 94 gram panchayats in Sangamnar
This is the division structure of 94 gram panchayats in Sangamnar

संगमनेर ः जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत संगमनेर तालुक्‍यातील 94 ग्रामपंचायतींची पंचवार्षिक मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम तहसील निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार संबंधित गावचे तलाठी आणि ग्रामसेवकांनी स्थळ पाहणी करुन प्रभाग, सीमा निश्‍चित करुन व अनुसूचित जाती, जमाती यांचे आरक्षण निश्‍चित केले आहे. 5 फेब्रुवारीला झालेल्या विशेष ग्रामसभेत प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंत लेखी हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे. 

या आहेत ग्रामपंचायती

आरक्षण जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींची नावे अकलापूर, आंबी दुमाला, आंबी खालसा, औरंगपूर, भोजदरी, बोटा, चंदनापुरी, चणेगाव, चिखली, चिंचपूर बुद्रूक, देवगाव, दाढ बुद्रूक, देवकौठे, डिग्रस, हिवरगाव पठार, हिवरगाव पावसा, जाखूरी, जवळे बाळेश्वर, जवळे कडलग, खांजापूर, कनोली, कऱ्हे, कासारा दुमाला, कासारे, कौठे मलकापूर, कौठे बुद्रूक, कौठे धांदरफळ, कौठे कमळेश्वर, कौठे खुर्द, खळी, खांबे, खांडगाव, खंदरमाळवाडी, खरशिंदे, कोकणगाव, कोंची मांची, कुरण, कुरकुंडी, लोहारे, कुरकुटवाडी, महालवाडी, मालदाड, माळेगाव पठार, माळेगाव हवेली. 

यांचाही आहे समावेश
मंगळापूर, मनोली, मेंढवण, म्हसवंडी, मिरपूर, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, नांदूर खंदरमाळ, निमगाव बुद्रूक, निमगाव खुर्द, निमगाव टेंभी, ओझर बुद्रूक, पळसखेडे, पानोडी, पारेगाव बुद्रूक, पारेगाव खुर्द, पेमगिरी, पिंपळगाव माथा, पिंपळे, पिंपळगाव देपा, पिंप्री लौकी अजमपूर, पोखरी बाळेश्वर, प्रतापपूर, राजापूर, रायते, रायतेवाडी, समनापूर, संगमनेर खुर्द, सांगवी, सावरचोळ, सावरगाव तळ, शेडगाव, शिबलापूर, शिंदोडी, शिरसगाव धुपे, शिरापूर, सोनेवाडी, सोनोशी, सुकेवाडी, तिगाव, वेल्हाळे, वडगाव लांडगा, वडगावपान, वनकुटे, वरुडी पठार, वरवंडी, झरेकाठी, झोळे, शेंडेवाडी याप्रमाणे आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com