साताऱ्यात मंडल अधिकाऱ्यास लाच घेतल्याप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

सातारा : नाहरकत दाखल्यासाठी 500 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वर्ये (ता. सातारा) येथील मंडल अधिकारी वैभव राजाराम माळी (वय 45, मूळ रा.रहिमतपूर ता.कोरेगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 
आज (ता. 4) दुपारी ही कारवाई करण्यात आली. 

पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांना एक नाहरकत दाखल पाहिजे होता. यासाठी ते वैभव माळी याला भेटले. मात्र काम करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. या बाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: divisional officer arrested for 5000 bribe