चोरट्यांची दिवाळी, सोलापूरकरांचा शिमगा; काय घडले सोलापुरात?

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

ऐन दिवाळीत सोलापूर शहरात विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

सोलापूर : ऐन दिवाळीत शहरात विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरी झालेल्या नागरिकांवर पोलिसांच्या नावाने शिमगा करण्याची वेळ आली आहे. चोरीच्या घटनांवर नियंत्रण आल्याचे सांगणाऱ्या पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिले आहे. 

खरेदीला गेल्यावर पर्स चोरली 
दिवाळीसाठी खरेदीसाठी गेल्यानंतर महिलेची पर्स चोरली. पर्समध्ये 9400 रुपयांची रोकड, दहा हजारांची सोन्याची अंगठी, मोबाईल, इमिटेशन ज्वेलरी असा एकूण 30 हजार रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी प्रदीप शंकर गायकवाड (वय 31, रा. अक्षत पाम्स, डोणगाव रोड, सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्या पत्नी आई आणि मुलीसह दिवाळीच्या खरेदीसाठी मधला मारुती परिसरातील बाजारपेठेत गेल्या होत्या. चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन पर्स चोरली. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. 

कोल्हापुरातल्या एकमेव आमदाराची दखल शिवसेना घेणार का?

घरात घुसून रोकड, मोबाईल चोरला 
घराचा दरवाजा ढकलून पॅन्टच्या खिशामध्ये रोकड आणि मोबाईल असा एकूण चोवीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विजयकुमार सिद्राम हलकट्टी (वय 37, रा. मदर इंडिया झोपडपट्टी, सत्तर फूट रोड, कुमठा नाका सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 26 ऑक्‍टोबर रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षण सोडतीची तारीख ठरली

दुकान फोडून कपडे नेले 
आकाशवाणी केंद्र ज्योती नगर येथील दुकान फोडून चोरट्याने 11 नग जिन्स पॅन्ट आणि डीव्हीआर चोरून नेला. विकास शरणप्पा चौगुले (वय 26, रा. सुलतानपूर ता. अक्कलकोट) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दुकानाचा पन्हाळी पत्रा कापून प्रवेश करून चोरट्यांनी कपड्यांची व इतर साहित्याची चोरी केली. 

पोलिस निरीक्षकाचीच साखळी चोरली

टेरेसवरून घरात येऊन रोकड चोरली 
जोडभावी पेठेतील मेतन हॉस्पिटल परिसरात टेरेसवरून घरात येऊन दहा हजारांची चोरी केली. पवन अरविंद बोमड्याल (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्याने टेरेसवरील लाकडी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. बेडरूममधील पर्समधून दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

आसरा चौकात मोबाईल लंपास 
आसरा चौकातील कसारा कॉम्प्लेक्‍समधील लक्ष्मी जनरल स्टोअर्स याठिकाणी चोरट्याने मोबाईल चोरी केला. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. महादेव भागवतआप्पा लांबतुरे (वय 53, रा. सिल्वर स्पिंग अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diwali festival various theft incidents in solapur city