आत्मिक सुखासाठी सत्कर्म करा : अण्णा हजारे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पारनेर- "आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस सुखासाठी फक्त वेड्यासारखा पळतोय. इतरांना फसवून आपला फायदा कसा होईल, याकडे त्याचे लक्ष आहे. मात्र, खऱ्या आत्मिक सुखासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त सत्कर्म करीत राहा,'' असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. 

अळकुटी येथे कुंदनकाका मित्रमंडळातर्फे परिसरातील दीड हजार ज्येष्ठांचा अमृतमहोत्सव कार्यक्रम झाला. त्या वेळी हजारे बोलत होते. 

कुंदन साखला यांनी आपल्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून, परिसरातील 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार केला. या वेळी खासदार दिलीप गांधी, जैन संघटनेचे पारस मोदी, अशोक लुधियाना, अशोक पगारिया, रुचिरा सुराणा, अशोक कटारिया, शरद लेंडे, सुजित झावरे, वसंत चेडे, डॉ. भास्कर शिरोळे, सुनील थोरात, मधुकर उचाळे, सबाजी गायकवाड, संजय मते, बाळासाहेब पुंड आदी उपस्थित होते. 

Web Title: Do good woek for spiritual happiness