मुस्लिम स्मशानभूमीत रस्त्याचे बांधकाम नको

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 27 जुलै 2018

मंगळवेढा - तालुक्यातील निंबोणी ग्रामपंचायतीने मुस्लिम स्मशानभूमीत रस्ता बांधण्यासाठी ग्रामनिधीचा दुरुपयोग करीत अनाधिकृतपणे रस्त्याचे काम केल्याची तक्रार येथील मुस्लिम समाजातील 16 नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली

या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्या आहे. या निवेदनावर बाबुलाल शेख, सददाम तांबोळी, गफुर तांबोळी, रहिमान तांबोळी, जाकीर तांबोळी, बाळु सुतार, हिरालाल शेख, अमुलाल शेख, बंडू शेख, खुदा सुतार, सत्तार तांबोळी, शेखलाल शेख, मौला मुलाणी यांच्या सहया आहे.

या निवेदनामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत मालमत्ता क्र 299/अ ही मालमत्ता मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमी करिता राखीव असुन, या गावातील या समाजाचे लोक जास्त आहेत. भविष्यात असलेली जागाही अपुरी पडणार असून, या ठिकाणाहून रस्त्याचे काम न करण्याची विनंती केली आहे. तरी ग्रामपंचायतीने मनमानी करत आर्थिक हिताचा विचार करुन स्मशानभूमीतून रस्त्याचे काम करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदर मालमत्ता रजिस्टरमध्ये खाडाखोड करण्यात आली. या समाजाच्या जागेत ग्रामपंचायतला घुसविण्यात आले. या प्रकारात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करुन झालेल्या अनाधिकृत रस्त्याचे काम थांबवण्यात यावे 

सदरच्या जागेत रस्त्याचे काम करण्याबाबतची मागणी प्राप्त नाही व रस्त्याचे काम करण्याच्या सुचना दिलेल्या नाहीत या प्रकाराची आमच्या कार्यालयाचा संबंध नाही 
एस.डी.पाटील उपअभियंता 

जिल्हा परिषद बांधकाम सदरची जागा ग्रामपंचायतची असून ग्रामनिधीतून रस्त्याचे काम एका बाजूने करण्यात आले आहे.
अभिजित लाड ग्रामविकास अधिकारी

Web Title: do not do Road construction in Muslim crematorium