'भारत बंद'ला नगरच्या बाजारपेठेत फज्जा 

do not response for Bharat Bandh in Nagar
do not response for Bharat Bandh in Nagar

नगर : सामान्यांच्या दृष्टीने आवाक्‍याबोहर चाललेली वाढती महागाई व इंधनांच्या रोज वाढत चालेल्या बाजारभावाच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे पुकारण्यात आलेल्या भारत बंदला नगरच्या बाजारपेठेत शून्य प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील अनेक विरोधी पक्ष या आंदोलनात सहभागी झाले. मात्र, त्याचा कोणताच परिणाम आज नगरच्या बाजारात जाणवला नाही. भारत बंदचे आवाहन करण्यासाठी देखील कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते शहरातील बाजारपेठेत फिरकले नाहीत.

परंतु भारत बंदच्या पार्श्‍वभुमीवर बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी होते. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दराने गाठलेला उच्चांक, जागतिक बाजारपेठेत रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई आदी विषयांवर काँग्रेसतर्फे आज 'भारत बंद'चे आवाहन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह डाव्यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता. शहरातील बाजारपेठेत कोणताच परिणाम दिसून आला नाही.

सकाळी नेहमीप्रमाणे व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. कापडबाजार, डाळमंडई, सर्जेपुरा, गंजबाजार आदी महत्त्वाच्या बाजारपेठांत ग्राहक तुलनेत कमी होते. मात्र, व्यवहार करणाऱ्यांना या आंदोलनाची कल्पनाही नसल्याचे जाणवले. दुपारनंतर बंदचा प्रतिसाद पाहत ग्राहकांचे प्रमाण थोडे वाढले. शाळा, महाविद्यालये, एसटी बस, खासगी प्रवासी वाहतूक, विविध शासकीय कार्यलये नेहमी प्रमाणे सुरू होती.

यापूर्वीच्या सरकारनेही इंधनाच्या वाढत्या किंमतीवर कोणतेही नियंत्रण ठेवल्याचे दिसले नाही. सध्याच्या भाजप सरकारकडूनही तेच सुरु आहे. सरकारमधील व्यक्‍ती बदलतात. पण, सामान्यांच्या विचार करणारी धोरणे कुणाकडेच नसतात, याची खंत वाटते. 

-आनंद बोरा, व्यापारी, नगर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com