ऑनलाईन व्यवहार करा ; सन्मानास पात्र व्हा

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018


हे व्यवहार करावेत ऑनलाईन पद्धतीने 

बॅंकेत पैसे भरणे, काढणे, मिळकत कर, वीज बिल, टेलिफोन बील, मोबाईल बिल, रिचार्ज, पेट्रोल तसेच दैनंदिन खरेदी.

सोलापूर : आपले सर्व व्यवहार ऑनलाईन करणारे महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून प्रथमश्रेणी अधिकारी सन्मानास पात्र होणार आहेत. सोबतीला त्यांना बक्षिसही दिले जाणार आहे. डिजीटल पेमेंट योजनेंतर्गत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. 

महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने केले जाते. त्यासाठी संबंधित बॅंकेने सर्वांना एटीएम व डेबीट कार्ड उपलब्ध करून दिले आहे. तसेच जवळपास सर्वच व्यापाऱ्यांकडून स्वाईप कार्ड स्वीकारण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपले सर्व आर्थिक व्यवहार रोखीने, धनादेश किंवा डीडीद्वारे न करता ऑनलाईन डिजीटल पद्धतीने करावेत. या प्रक्रियेत सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अग्रेसर रहावे असे आयुक्तांनी अपेक्षित धरले आहे. 

जे अधिकारी व कर्मचारी आपले आर्थिक व्यवहार 1 ऑगस्ट ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत जास्तीत जास्त डिजीटल पेमेंट पद्धतीने करतील त्या कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच बक्षिस देऊन गौरविण्यातही येणार आहे. त्यामुळे या योजनेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवितानाच डिजीटल पेमेंटमध्ये सोलापूर महापालिका अग्रस्थानी नेण्याची चांगली संधी मिळणार आहे. 

हे व्यवहार करावेत ऑनलाईन पद्धतीने 

बॅंकेत पैसे भरणे, काढणे, मिळकत कर, वीज बिल, टेलिफोन बील, मोबाईल बिल, रिचार्ज, पेट्रोल तसेच दैनंदिन खरेदी.

Web Title: Do Online Transaction and get benefit too