नको नुसता लळा आम्हाला हवी विशेष शाळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

मूकबधीर विद्यार्थ्यांची अपंगदिनी आर्त हाक; शहराच्या विविध भागांतून फेरी

सातारा  - नको नुसता लळा आम्हाला हवी विशेष शाळा, असला जरी कर्णबधिर शिक्षणाला नको उशीर, अपंगांचे पुनर्वसन करा अशी आर्त हाक देत आज येथील समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त शहराच्या विविध भागांतून विविध वाद्यांच्या आणि घोषणांच्या गजरात फेरी काढली. मूकबधीर विद्यालयामध्ये यानिमित्ताने आजपासून सप्ताह साजरा केला जात आहे. त्यांतर्गत ही फेरी काढण्यात आली.

सकाळी नऊ वाजता विद्यालयातून फेरीस प्रारंभ झाला. पोलिस करमणूक केंद्रापासून राजपथावरून फेरी मोती चौकात गेली. तेथून कर्मवीर भाऊराव पाटील पथावरून फेरी परत शाळेत गेली. या वेळी विद्यार्थी विविध घोषणांचे फलक मिरवत आपल्याकडे लक्ष वेधून घेत होते. अपंग दिनानिमित्ताने आयोजित सप्ताहात विविध स्पर्धांसह मूकबधीर वधू- वर मेळावाही आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका शोभा गिरमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. त्या अंतर्गत सोमवारी (ता. पाच) चित्रकला स्पर्धा, मंगळवारी (ता. सहा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण
दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले जाणार आहे. बुधवारी (ता. सात) मूकबधीर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे, तसेच फनिगेम होणार आहेत. गुरुवारी (ता. आठ) क्रीडा स्पर्धा आणि शुक्रवारी (ता. नऊ) रांगोळी स्पर्धा होणार आहेत. शनिवारी (ता. दहा) वक्‍तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत. याच दिवशी मूकबधीर मुलामुलींचा वधू- वर मेळावा आयोजित केला असून, इच्छुक वधू- वर व त्यांच्या पालकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मूकबधीर विद्यार्थी आपल्या कल्पनेतून आणि प्रयत्नातून बुधवारी हस्तकला प्रदर्शन आयोजित करणार आहेत. या प्रदर्शनास भेट देऊन त्यांच्या कलागुणांचे कौतुक करावे, असे आवाहन मुख्याध्यापिका गिरमकर यांनी केले आहे.

Web Title: Do we really want to look special schools