Video : कोरोनाशी लढण्यासाठी शंभर डॉक्‍टर आले एकत्र; रक्षक क्‍लिनिक सुरू

Video : कोरोनाशी लढण्यासाठी शंभर डॉक्‍टर आले एकत्र; रक्षक क्‍लिनिक सुरू

लोणंद (जि.सातारा) : कोरोना रुग्णांवरील उपचारा दरम्यान जगभरातील अनेक डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक ताज्या घटना असताना, त्याची तमा न बाळगता मोठ्या धाडसाने व कर्तव्य भावनेतून लोणंद व नीरा येथील १०० डॉक्टरांनी एकत्र येत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाची लढाई लढण्याची आणि ती जिंकण्याची तयारी करत लोणंद येथील श्री सिध्दीविनायक हॉस्पीटलमध्ये सर्दी, ताप,खोकला व धाप आदी आजारांची तपासणी करण्यासाठी ' रक्षक क्लीनिक ( ओपीडी) बाह्यरुग्ण विभाग सुरु केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर राज्यात ग्रामिण भागातील खाजगी डॉक्टरांनी एकत्र येवून सुरू केलाला हा पहिला दवाखाना आहे.हा दवाखाना राज्यालील पहिला पायलट प्रयोगही मानला जात आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिंह व खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांच्या सुचनेनुसार लोणंद मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशन लोणंद - निरा यांच्या सर्व डॉक्टर्सनी एकत्र येवून हा निर्णय घेत येथे हा दवाखाना सुरू केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत यांच्या येथील लोणंद -नीरा रस्त्यावरील श्री सिद्धीविनायक हॉस्पीटल अॅन्ड क्रिटिकेअर या रुग्णालयाच्या तळमजल्यावरील पाच सुसज्ज खोल्यांत हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे सर्व अद्यावत यंत्र समुग्री तैनात ठेवण्यात आली आहे.

तसेच रोज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत या दोन्ही असोसिएशन मधील रोज तीन डॉक्टर्स येथे सायमलटेनिसली कार्यरत राहून येणाऱ्या रुग्णांच्या तपासण्या करणार आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची दक्षता घेत प्रशिक्षीत नर्स व अन्य स्टाफ येथे नेमण्यात आला आहे.

त्यांना कोरोना रुग्णलयात वापरले जात असलेले उच्च प्रतिचे मास्क ड्रेसकोड संरक्षणार्थ देण्यात आले आहेत. दरम्यान रुग्णालयापर्यंत येण्यासाठी लोखंडी रेलिंग करुन तेथे ठिकठिकाणी बाकडी ठेवून रुग्णांच्या बसण्याची व्यवस्था केली आहे.हात धुण्यासाठी सॅनिटायझर,लिक्वीड साबण, कापडी टॉवेल्स ठेवण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात येथील पटांगणावर मंडप उभारून रुग्णांच्या थांबण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे.

दरम्यान या रुग्णालयाचा आज (ता. २९) वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले -राजापूरकर यांच्या प्रमुख उपस्थीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, खंडाळा तालुका वैदयकिय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत बागडे,लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष चौधरी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितिन सावंत,लोणंद मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद काकडे, उपाध्यक्ष राहुल क्षीरसागर, डॉ. नानासाहेब हाडंबर, डॉ. सुधिर धायगुडे,डॉ. किशोर बुटीयानी,डॉ. प्रताप गोवेकर, डॉ. अवधूत किकले, डॉ. देवदत्त राऊत व गजेंद्र मुसळे उपस्थित हाेते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी संगीता चौगुले -राजापूरकर म्हणाल्या, देशावरील संकटाचा सामना करण्यासाठी येथील डॉक्टरांनी मानवता व कर्तव्य भावनेतून पुढे येवून प्राशासनाला साथ देण्याचा आणि कोरोनाच्या संकटाचा सामाना करुन ही लढाई जिंकण्याचा घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे. राज्यातील पहिला पायलट प्रयोग आहे.काही अडचणी आहेत त्यामधून निश्चितपणे मार्ग काढला जाईल.

तहसिलदार दशरथ काळे म्हणाले, ज्या अडचणी येणार आहेत त्या सर्व जिल्हा प्रशासणाला कळवून त्या तातडीने सोडवून घेत या रुग्णालयाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली.

डॉ. अविनाश पाटील म्हणाले, येथे या दोन्ही असोसीएशन मधील ज्या डॉक्टरांनी नेमणूक केली आहे. त्या सर्व डॉक्टरांनी दररोज वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे. अन्यथा कारवाई करण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नाही.याची दक्षता घ्यावी.आपणा सर्वांची ही सामूहिक जबाबदारी आहे.ती पार पाडावीच लागणार आहे.

डॉ. नितीन सावंत म्हणाले, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या सुचनेप्रमाणे लोणंद मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशन लोणंद - निरा यांच्या सहकार्यातून मानवता व कर्तव्य भावनेतून येथे सर्दी, ताप, खोकला व धाप या रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी हे रूग्णालय येथे सुरू केले आहे. त्यासाठी पुरेशी यंत्रणा तयार ठेवली आहे.येथील दोन्ही असोसिएशनचे १०० डॉक्टर्स येथे काम करणार आहेत.राज्यातील हा पहिलाच पायलट प्रयोग आहे.कोरोनाची ही लढाई सर्वांच्या सहकार्यातून निश्चितपणे जिंकू.

डॉ. मिलिंद काकडे म्हणाले, सर्वांच्या एकजुटीने हा पर्वत निश्चितपणे पेलू सध्या दोन्ही असोसीएशनच्या माध्यमातून यासाठी निधी उभा केला आहे. मात्र पुढच्या काळात मोठया निधीची आवश्यकता भासणार आहे. प्रशासणाने याबाबत ठोस निर्णय घ्यावा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com