कराड - तांबवेत पिसाळलेल्या कुत्र्याचा 20 जणांवर हल्ला

हेमंत पवार
शुक्रवार, 18 मे 2018

कराड (सातारा) : तालुक्यातील तांबवे या गावामध्ये सुमारे पंधरा ते वीस जणांना पिसाळलेले कुत्रे चावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कराड (सातारा) : तालुक्यातील तांबवे या गावामध्ये सुमारे पंधरा ते वीस जणांना पिसाळलेले कुत्रे चावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमी झालेल्या रुग्णांना कराडच्या उपजिल्ह रुग्णालयात व सुपणे आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने शेतातून गावामध्ये दिसेल त्याला काही कळण्याअगोदरच चावा घेतला. सुमारे पंधरा ते वीस जणांना कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. बाधित रुग्णांना उपचारासाठी कराडचे उपजिल्हा रुग्णालय  व सुपणे येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: dog attacks on 20 people in tambave karad

टॅग्स