मोकाट कुत्र्यांची दहशत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

कोल्हापूर - कुत्तोंसे मुकाबला करना मुश्‍किलही नहीं बल्की नामुनकीन है... अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. शहरासह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही या कुत्र्यांच्या कळपांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. 

कोल्हापूर - कुत्तोंसे मुकाबला करना मुश्‍किलही नहीं बल्की नामुनकीन है... अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. शहरासह जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. रात्रीच नव्हे तर दिवसाही या कुत्र्यांच्या कळपांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. 

दहा-पंधरा वर्षांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला आणि इंजेक्‍शनसाठी सीपीआरमध्ये गेलो होतो, असे क्वचितच घडत होते. मात्र कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शहरासह उपनगरेही याला अपवाद राहिले नाहीत. एक-दोन करत मोकाट कुत्र्यांचे कळपच्या कळप तयार होऊ लागले. मांस विक्रेत्यांच्या दुकानातील टाकाऊ पदार्थ, हॉटेल व्यावसायिकांकडूनही खराब झालेले अन्न उपनगराच्या मोकळ्या जागेत टाकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. त्याच पटीत मोकाट कुत्र्यांचीही संख्या वाढू लागली आहे. मांसाला चटावलेल्या मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले व नागरिकांवर हल्ले करण्याचे व त्यांचे लचके तोडण्याचे प्रकार वाढू लागलेत. कसबा बावडा येथील झूम प्रकल्प परिसरात असे गंभीर प्रकार वारंवार घडतात. दीड महिन्यापूर्वी गजबजलेल्या राजारामपुरीतील रस्त्यावरून आजीसोबत जात असलेल्या शाळकरी मुलावर कुत्र्याच्या कळपाने हल्ला केला. त्याच्या अंगाचे लचके तोडले. आजीने केलेल्या आरडाओरडीमुळे नागरिकांनी मुलाची सुटका केल्याने तो बचावला. या प्रकारानंतर वर्षानगरात कालच अडीच वर्षीय बालिकेवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. 

जीव मुठीतच घेऊन चालावे लागते... 
रात्री नऊनंतर शहराच्या मुख्य मार्गावरून जाताना कुत्र्यांच्या भीतीने जावे लागते. मोटारसायकलवरून जातानाही कुत्री पाठलाग करून हल्ला करू लागली आहेत. याउलट आर. के. नगर, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, रेणुका मंदिर परिसर, आयसोलेशन रस्ता, वर्षानगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, जिवबा नाना, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, फुलेवाडी, बोंद्रेनगर, रिंग रोड, विक्रमनगर, मुक्त सैनिक वसाहत, मार्केट यार्ड आदी उपनगरांत मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. येथील नागरिकांना व लहान मुलांना रात्रीच नव्हे तर दिवसाही जीव मुठीत घेऊन जावे लागते. महापालिका प्रशासनाने एखाद्याचा जीव गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा वेळीच मोकाट कुत्र्यांवर कारवाई करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 

Web Title: Dog issue in kolhapur