श्वान प्रेमींचा उद्या सांगलीत मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकांकडून अन्यायी श्वान कर आकारणी निषेधार्थ मनपावर श्वान प्रेमी व नागरिक यांच्यावतीने उद्या (ता. १८) मोर्चा काढण्यात येणार आहे.

सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान बाळगणा-या
नागरिकांना ५००० रु कर आकारण्याचा प्रस्ताव प्रशासन व सत्ताधारी यांनी आणला आहे. सदर कर अन्यायी व जाचक असल्याने त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे, अशी माहिती नगरसेवक शेखर माने यांनी दिली. 

ते म्हणाले, “राज्यांत ५००० रुपयांइतका इतका जाचक श्वान कर कोणत्याही महापालिकेकडून आकाराला जात नाही. परंतु सांगली, मिरज आणि कुपवाड मनपाने अजब व जाचक प्रस्ताव आणला आहे. ही रक्कम कोणत्या आधारे निश्चित केली आहे? काही व्यक्ती हे स्वतःच्या मालमत्तेचे स्वरक्षणासाठी व राखणीसाठी श्वान पाळतात . त्यांच्यावर पण हा अन्यायकारक कर का ? कर आकारणीमुळे  श्वान प्रेमींना मनपा काही सुविधा देणार आहे का? असल्यास त्याचा लेखी खुलासा सादर करावा.''

...तर महासभेत श्वान सोडणार
ठराव रद्द न केल्यास येत्या महासभेत श्वान सोडली जातील असा इशाराही यावेळी माने यांनी दिला.

Web Title: Dog lovers to protest against Sangli Municipal Corporation