सोलापूर : मोकाट कुत्री पळताहेत लाल रंगाच्या भीतीने (व्हिडिओ)

सोलापूर : मोकाट कुत्री पळताहेत लाल रंगाच्या भीतीने (व्हिडिओ)

सोलापूर : शहरात सध्या सुमारे 40 हजार मोकाट कुत्री असून त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका हतबल झाली आहे. मात्र, नागरिकांनी मोकाट कुत्र्यांपासून वाचण्यासाठी उपाय म्हणून घराबाहेर पाण्याच्या बाटलीत कुंकू किंवा लाल रंग भरून ठेवण्यास सुरवात केली आहे. त्याला पाहून कुत्री पळून जात असल्याने आता शहरात हा उपाय प्रत्येकजण करू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे तर लहान मुलांना खेळायला बाहेर जाता येईना, अशी स्थिती आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार मोकट कुत्रांना जिवे मारता येत नाही. दुसरीकडे महापालिकने निर्बिजीकरणाची निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने ती प्रक्रिया ठप्पच आहे. तत्पूर्वी, 2017 मध्ये पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांनी मोकट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यास सुरवात केली.

2018 मध्ये निर्बिजीकरणाची निविदा काढून चार हजार 800 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले. मात्र, यंदा काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने दोनवेळा मुदतवाढ द्यावी लागल्याचे डॉ. ताजणे यांनी सांगितले. कुत्र्यांनाही माणसांप्रमाणे जगण्याचा अधिकार असल्याचे सांगत सोलापुरातील काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांनी आंदोलने केली. त्यामुळे आता निर्बिजीकरणासाठी मक्‍तेदार पुढाकार घेत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही वाढत्या मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

शहरासह आमच्या घराशेजारी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे आम्हा महिलांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर घरासमोरच कुत्रे घाण करत असल्याने याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत पाण्यात लाल रंग टाकून घराबाहेर ठेवतो. त्यामुळे कुत्रे पळून जातात. 

- ज्योती कदम, गृहिणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com