कचरा हटल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या पंचवीस टक्क्यांनी घटली 

dog
dog

कऱ्हाड : शहरातील कचरा कोंडाळ्यासह सुमारे पन्नास ठिकाणच्या कचरा टाकण्याची ठिकाणे काढून टाकल्याने शहराच्या स्वच्छतेत तर भर पडली. त्याशिवाय त्या कचऱ्याच्या ढिगावर अन्नाच्या शोधार्थ येणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या सुमारे पंचवीस टक्क्यांनी घटली आहे. मोकाट कुत्र्यांवर पालिकेला स्वतंत्र काम करावेच लागत आहेच. मात्र कचऱ्याचे कोंडाळे व उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्यापासून शहरमुक्त केल्याचा परिणाम मोकाट कुत्र्यांची संख्या घटीवर झाली आहे.

पालिकेने मागील वर्षापासून स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आहे. त्यानुसार विविध उपक्रम पालिका राबवित आहे. तत्कालीन आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या उपक्रमाचे परिणाम शहरात सकारात्मक दिसू लागले आहेत. मागील वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर अशा कालावधीत श्री. वाटेगावकर यांनी चार महिन्यात शहर कचऱ्याच्या कोंडाळ्यापासून मुक्त करण्याचे ध्येय ठेवले. त्यानुसार त्यांनी शहरातील 30 कचऱ्याची कोंडाळी आणि उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याची सुमारी वीस ठिकाणे निवडली. अर्थात पन्नासपेक्षा जास्त ठिकाणे होती. ती नंतर त्यांनी हळूहळू बदलून टाकली. मात्र वरील पन्नास ठिकाणावर शहरातील सर्वात जास्त कचरा अनेक वर्षे पडत होता. ती कोंडाळी हटवणे म्हणजेच नागरीकांनाच अंगावर घेण्यासारखा प्रकार होता. मात्र तरिही आरोग्य विभागाने तो धाडसी निर्णय घेण्याचे ठरविले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात तीन नादुरूस्त घंटागाड्या दुरूस्त करून त्या वापरात आणल्या. त्या सोमवार पेठेत सुरू केल्या. त्याचे वेळापत्रक ठरविले. लोकांना सवय लागेपर्यंत त्या घंटागाड्य़ा नियमीत जात होत्या. त्यानंतर त्यांनी सोमवार पेठेतील स्मशानभूमी परिसरातील पहिले कचरा कोंडाळे कायमचे हलविले. तेथे तसा फलक लावण्यात आला. तेथे कोणी कचरा टाकू नये, यासाठी स्वतंत्र व्यक्तीही ठेवला. त्या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविल्याही. 

आरोग्य विभागाने हीच पद्धत शहरात अन्यत्र राबवत शहरातील सुमारे पन्नास पेक्षाही जास्त कचऱ्याची ठिकाणे हलविली. त्यात उघड्यावर पडलेल्या कचऱ्याची 20 स्वच्छ तर 30 कोंडाळी हलविण्यात आले. तेथे रांगोळी काढण्यात आली. ती लोकांना भावली. त्यानंतर घंटागाड्यांची संख्या वाढवून ती शहरात फिरविण्यात आली. त्याची लोकांना सवय लागली. आरोग्य विभागाने घेतलेल्या त्या निर्णयाचे सकारात्मक पडसाद शहरात दिसत आहेत. कचरा कोंडळ्यावर अन्नाच्या शोधार्थ रात्रभर बसणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या आता दिसेनासा झाल्या आहेत. हिंसक बनणारी मोकाट कुत्रीच आता त्या भागात दिसेनासात झाली आहे. वास्तविक तरिही मोकाट कुत्र्यांची संख्या अद्यापही जास्त आहे. मात्र कचऱ्याची ठिकाणे हटल्याने किमान पंचवीस टक्क्यांनी मोकाट कुत्र्यांची संख्या घटल्याचा पालिकेचा अभ्यास आहे. त्याबाबत त्यांनी अहवालही तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. 

कचऱ्याची ठिकाणे हटल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या घटली आहे. अन्नाच्या शोध घेण्यासाठी ते शहरातून बाहेर पडल्याने ती संख्या घटली आहे. त्यामुळे स्वच्छता हाही त्यावर एक चांगला उपाय होवू शकतो, याची जाणीव पालिकेस झाली आहे. त्यामुळे तो निर्णय शहराला फायद्याचा ठरतो आहे.
- विजय वाटेगावकर, नगरसेवक व माजी आरोग्य सभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com