विवाहितेचा छळ; दोन कोटींची मागणी

solapur
solapur

सोलापूर : तुझ्या आई-वडिलांची संपत्ती किती आहे? त्यात तुझ्या नावाचा हिस्सा आहे की नाही? तुझा हिस्सा मागून घे.. असे म्हणून विवाहितेचा छळ केला. माहेरून दोन कोटी रुपये आण म्हणून त्रास दिला. याप्रकरणात पतीसह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पती रेवणसिद्ध गुळवे (रा. गौरीहर सोसायटी, सदाशिव पेठ, स्वारगेटजवळ, पुणे), सासरा प्रकाश शामराव गुळवे, प्रसाद शेटे, सासू शरयू, नणंद रुपम शेटे, पतीची दुसरी पत्नी ज्योती मन्मथ दरोड व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या रेवणसिद्ध गुळवे (वय 36, रा. बुधवार पेठ, सम्राट चौक, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विद्या यांच्या वडीलांचा बोअरवेल आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. आई बीएसएनएलमधून सुपर वायझर पदावरून निवृत्त झाल्या आहेत. विद्या आणि रेवणसिद्ध यांचा 30 जून 2006 रोजी लग्न झाले होते. विद्याच्या आई-वडीलांनी लग्नामध्ये मोठा हुंडा दिला. पती व नातेवाईकांच्या कपड्यांसाठी 1 लाख 20 हजार दिले. लग्नासाठी 15 लाखांचा खर्च केला होता. काही दिवसांनी रिशेप्शन झाले. तेव्हांनी 10 लाखांचा खर्च केला. 

लग्नानंतर दोन महिन्यातच आरोपींनी तुझ्या आई-वडिलांची संपत्ती किती आहे, तुझ्या नावाचा आहे का नाही, तू तुझा हिस्सा मागून घे असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. पती व सासू-सासऱ्यांसोबत अमेरीकेत असताना दुसरे मूल नको म्हणून गर्भपात करण्यास भाग पाडले. वडीलांकडून दोन कोटी रुपये आण छळ केला. 31 डिसेंबर 2018 रोजी पती रेवनसिद्ध याने ज्योती मन्मथ दयाडे या मुलीशी पुणे येथे रजिस्टर पद्धतीने दुसरे लग्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com