लढा दुष्काळाशी : दुष्काळाला दानशूर व्यक्तींची टक्कर (व्हिडीओ)

Donors offer water to Villagers in Atpadi Sangli drought area
Donors offer water to Villagers in Atpadi Sangli drought area

दिघंची (आटपाडी, जि. सांगली) : दुष्काळामुळे जमिनीतल्या पोटातले झरे इथं आटले, तरी इथं माणुसकीचे झरे जिवंत आहेत. या गावातही दुष्काळामुळे पाण्याची कमतरता आहे. टँकरनं पाणी लोकांना पुरवलं जातं. पण सरकार हे पाणी पुरवत नाही, ग्रामस्थांना विकतही पाणी घ्यावं लागत नाही, तर या गावातील काही दानशूर व्यक्ती सकाळ-संध्याकाळ नागरीकांसाठी पाण्याचे टँकर गावात आणतात. 
 
आटपाडीतील दिघंची गावातील काही दानशूर व्यक्ती स्वखर्चाने गावात पाणीपुरवठा करत आहेत. यापैकीच एक भैय्यासाहेब मोरे सांगतात, 'आमच्या गावाला दुष्काळ पाचवीला पुजला आहे. गावात माता भगिनी गावाबाहेर पाण्यासाठी हिंडतात. मला ते योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी आणि माझ्या काही मित्रांनी ग्रामस्थांना पाणी पुरविण्याचे ठरविले.'


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com