पृथ्वीराज चव्हाणांवर टिका करताना संयम बाळगावा - मनोहर शिंदे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मलकापूर (कऱ्हाड) : मलकापूरला 'क' पालिकेचा दर्जा मिळावा, यासाठी कधीपासून प्रयत्न सुरू झाले. त्याची वस्तूस्थिती काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिका करताना संयम बाळगावा, असे आवाहन उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. आज बुधवार आहे. पांडुरंगाचा वार आहे. संयम बाळगण्यासाटी व आरोप करताना पांडूरंग त्यांना सद्दबुद्धी देवो, हीच ईश्वराजवळ प्रार्थना आहे, अशी टिप्पण्णी शिंदे यांनी केली. 

शिंदे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी मलकापूरला क दर्जा का मिळवून दिला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तो खोटा आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी नगरपंचायत झाली. प्रत्यक्षात नगरपंचायतीला पालिकेचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव 2016 मध्ये दिला. त्यामुळे श्री. चव्हाण यांचा तेथे काहीच संबध नव्हता. भाजप सरकार आल्यानंतर तो प्रस्ताव दिला गेला. त्याची माहिती न घेता, अभ्यास न करता व संयम न ठेवता होणारा आरोप चुकीचा आहे. जे कोणी असा आरोप करत आहेत. त्यांनी संयमाने बोलणे गरजेचे आहे. पालिका दर्जाचा प्रश्न आता न्याप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्याबाबत न्यायालयात बाजू मांडणार आहोत.

पालिकेचा दर्जा मिळणे हेच खर प्रत्येकाला उत्तर आहे. दोन जुलै रोजी शासनाला अहवाल देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुले तो अहवाल आल्यानंतर पुढे काय होणार आहे. ते कळणारच आहे. मलकापूरचा विकास पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच झाला आहे. (कै.) आनंदराव चव्हाण, (कै.) प्रेमलाकाकी चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे मलकापूर मॉडेल शहर म्हणून राज्यातच नव्हे तर देशात नावारूपास आले आहे. मलकापूरच्या प्रगतीत त्यांचा नेहमीच सिंहाचाच वाटा राहिला आहे. त्या सगळ्या अभ्यास करून त्यांच्यावर होणारे आरोप संयमाने करण्याची गरज आहे. आरोप होतील, मात्र त्यात संयमीपणा दिसला पाहिजे.

मलकापूरकरांना न्यायालय निश्चीत न्या देईल. त्यांनी दाखल करून घेतलेली याचिका व त्यांनी राज्य शासनाला मागविलेला अहवाल यामुळे पालिकेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात ती मंजूरी आली तर ते टिम वर्क असणार आहे. ते कोणा एकाचे काम नाही. पालिकेचा दर्जा मिळावा, यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे जसे सहकार्य़ मिळाले आहे, तसेच सहकार्य आत्ताचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसा यांचेही मिळाले आहे. प्रत्येकजणांच्या सहकार्यातून पालिकेचा दर्जा मिळणार आहे. तेच खरे उत्तर असणार आहे. प्रस्तावाचा प्रवास व त्याला मिळालेले सहकार्य या सगळ्याचा विचार करता आत्ता पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यासाठी काम जाले आहे. त्यामुळे मलकापूरकरांना नक्कीच न्याय मिळेल. 

Web Title: dont critic former cm prithviraj chavan said manohar shinde