ऍडमिशन, नोकरीसाठी नका देऊ पैसे! 

परशुराम कोकणे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सोलापूर : वैद्यकीय किंवा अन्य शैक्षणिक प्रवेशाकरिता कोणी पैसे मागत असेल, नोकरी लावतो म्हणून आमिष दाखवत असेल तर सावधान..! पैसे देऊन ऍडमिशन किंवा नोकरी मिळविण्याचा जमाना गेला आहे. आता सर्वकाही गुणवत्तेवर आणि ऑनलाइन होत असल्याने ऍडमिशन किंवा नोकरीसाठी लाखो रुपये देऊन आपली फसवणूक करून घेऊ नका. जर कोणी अशाप्रकारे आमिष दाखवून पैशांची मागणी करीत असेल तर थेट आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

वैद्यकीय महाविद्यायात प्रवेश मिळवून देतो, परदेशात नोकरी लावतो, असे म्हणून कोट्यवधीची फसवणूक झाल्याचे गुन्हे सोलापुरात दाखल झाले आहेत. वैद्यकीय प्रवेश फसवणूक प्रकरणातील संदीप शहा, सौरभ कुलकर्णी या आरोपींना गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली आहे. ऍडमिशन आणि नोकरीसाठी आमिष दाखविणारे लोक लोकांना फसविण्यासाठी तयारच असतात. जाहिरातबाजी करून लोकांना जाळ्यात ओढले जाते. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविले जाते. मात्र, अशाप्रकारे कोणालाही प्रवेश मिळत नसल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. 

ऍडमिशन किंवा नोकर भरतीसाठी प्रत्येक संस्था जाहिरात देते. त्यांच्या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली जाते. अधिकृत कार्यालयाशिवाय, कंपनीशिवाय इतर कोणी अशाप्रकारची माहिती देत असेल तर दक्ष राहायला हवे. कोणताही व्यवहार करण्याआधी त्यांची ओळख विचारली पाहिजे. व्यवस्थापन कोट्यातून कोणी सांगत असेल तर खात्री करायला हवी. थेट शिक्षण संस्थेशी संपर्क साधायला हवा. मध्यस्थामार्फत नोकरी मिळत नाही. शासन किंवा अन्य कोणत्याही कंपन्या अशाप्रकारे ऍडमिशन किंवा भरतीसाठी कोणतीही व्यक्ती नियुक्त करीत नाहीत, असे आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश वेळापुरे यांनी सांगितले. 

ऍडमिशन किंवा नोकरी मिळवून देतो म्हणून कोणी पैशांची मागणी करीत असेल तर आधी ती संस्था, कंपनी अस्तित्वात आहे का हे तपासावे. जागा आहेत का याबाबत कार्यालयात जाऊन खात्री करावी. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, त्यामुळे ऑनलाइन माध्यमातून आपण खात्री करू शकतो. 
- योगेश वेळापुरे, सहायक पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा

Web Title: Dont give donation for job and education