लॉकडाऊन नको, जनता कर्फ्यू पाळा : पालकमंत्री जयंत पाटील ...संपर्कांतील लोकांना शोधणार; डॉक्‍टरांनी रुग्णांना टाळल्यास कारवाई 

विष्णू मोहिते
Friday, 4 September 2020

सांगली-  जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे, मात्र लॉकडाऊनबाबत वेगवेगळी मतांतरे आहेत. लोक दोन्ही तोंडाने बोलत असतात. त्यामुळे लॉकडाऊन नको, जनता कर्फ्यू पाळा, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केले. लोकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे. बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधण्यासाठी विशेष मोहिम राबविली जाईल. कोरोनाच्या साथीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने उपचारात अडथळे येत आहेत. ही पदे तात्काळ भरण्याची आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतला. सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे, जिल्हाआरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात करोनाचा समूह संसर्ग झाला आहे, मात्र लोकांनी घाबरू नये, लोकांनी काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊन बाबत वेगवेगळी मतांतरे आहेत. लोक दोन्ही तोंडाने बोलत असतात. जर लॉकडाऊन केले तर त्याचे पालन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आम्ही आवाहन करतो लोकांनी गरज असेल तरच बाहेर पडा. लोकांनी गांभीर्य लक्षात घेऊन काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये. टाळेबंदीपेक्षा संपर्कातील लोकांचा शोध घेणे महत्वाचे असून त्याच्यावर भर दिला पाहिजे. प्रशासन, आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी आवश्‍यकते उपाय करण्यात येतील.' 

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना शासकीय रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण होत आहे. मिरज शासकीय कोव्हिड हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने पद भरली जातील, जो आता स्टाफ आहे, त्यावर ताण पडून दिला जाणार नाही. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मधील रिक्त पदे आहेत. ती ही तात्काळ भरण्यात यावीत याबाबतचे आदेश पालकमंत्री श्री. पाटील यांनी आरोग्य विभागाला दिले. शहरातील काही रुग्णालयांमध्ये डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णांना दाखल केले जात नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्याबाबतची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाईल. नॉन कोविड हॉस्पिटल चालू राहिले पाहिजेत, डॉक्‍टर हे उपचार करत नाहीत, अशा तक्रारी आहेत. डॉक्‍टरांनी नॉन कोव्हिडं रुग्णावर उपचार कारावेत असे आदेश बजावले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

उपचारासाठी दानशुरांची मदत घेणार 
पालकमंत्री म्हणाले, ""जिल्ह्यात ऑक्‍सिजनचा तुडवडा आहे, मात्र ऑक्‍सिजन उपलब्ध करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली जात आहे. कोविडची इंजक्‍शन महागडी असल्याने दानशूर व्यक्तीकडून यासाठी मदत घेतली जाणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't lockdown, follow public curfew : Guardian Minister Jayant Patil. will look for people in contact; Action if doctors avoid patients