थर्टी फर्स्टला रस्त्यावर नको धिंगाणा ! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सोलापूर  : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मित्रांसोबत पार्टी करून रस्त्यावर धिंगाणा घालण्याचा बेत करत असाल तर सावधान..! थर्टी फर्स्टच्या रात्री शहरातील चौकाचौकांत पोलिसांची नाकाबंदी असणार आहे. पार्टीत मद्य प्राशन करून पुन्हा घराकडे जाताना तुमच्यावर कारवाई होऊ शकते. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल सजत आहेत. काही मंडळी शहराबाहेर शांत ठिकाणी जाऊन पार्टी करण्याच्या तयारीत आहेत. 31 डिसेंबर रोजी सायंकाळनंतर नाकाबंदी वेळी पोलिस "ब्रिथ ऍनालायझर' घेऊन वाहनधारकांची तपासणी करणार आहेत. तपासणीत वाहनधारकांनी मद्य प्राशन केल्याचे आढळून आल्यास वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. चौकाचौकांतील नाकाबंदीसोबतच शहरात विशेष गस्ती पथकही असणार आहे. उत्साहात वेगाने वाहन चालविणाऱ्या, सायलेन्सर काढून आवाज करणाऱ्या, रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. 

एन्जॉय करा, पण जपून... 
नवीन वर्षाच्या स्वागताचा क्षण एन्जॉय करताना प्रत्येकाने वाहतुकीचे नियम आणि पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले पाहिजे. बाईक रॅलीवरही कारवाई होईल. उत्साहाच्या भरात रस्त्यावर फटाके उडवून प्रदूषण करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. 

थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तासाठी खास पथके नियुक्त करण्यात आली आहेत. शहरातील चौकाचौकांत पोलिस नाकाबंदी करून मद्य प्राशन केलेल्या वाहनधारकांवर कारवाई करतील. नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. हॉटेल आणि रेस्टारंट वेळेवर बंद करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. 
- अभय डोंगरे, 
सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा

Web Title: Dont make chaos on road on 31st December