esakal | ऑनलाईन शिक्षणावर भिस्त नको; नव्या कल्पना सूचवा...
sakal

बोलून बातमी शोधा

Don't rely on online education; Suggest new ideas ...

ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर शंभर टक्के विसंबून चालणार नाही. ही व्यवस्था सर्वच मुलांना मिळत नाही. त्यामुळे नव्या कल्पना सूचवा आणि शिक्षण वाचवा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले आहे. 

ऑनलाईन शिक्षणावर भिस्त नको; नव्या कल्पना सूचवा...

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : पाच महिने झाले शाळा बंद आहेत. पुढे किती काळ बंद राहतील, काहीही सांगता येत नाही. अशावेळी ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर शंभर टक्के विसंबून चालणार नाही. ही व्यवस्था सर्वच मुलांना मिळत नाही. त्यामुळे नव्या कल्पना सूचवा आणि शिक्षण वाचवा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले आहे. 

ऑनलाईन शिक्षणापासून खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी लांब आहेत. प्रत्येकाकडेच अँड्रॉईड मोबाईल हॅंडसेट नाहीत. कित्येकांना साधा फोन मिळत नाही. त्यांच्यावर अन्याय करायचा का? त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे करायला नको का? केवळ ऑनलाईन शिक्षण देऊन मुलांना ते समजते का? या प्रश्‍नांची बहुतांश उत्तरे नकारार्थी आहेत. असे असेल तर मग शिक्षकांनी नवे मार्ग शोधले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

त्या म्हणाल्या, ""शाळा बंद झाल्या म्हणून शिक्षण थांबले नाही व वेळ आपल्यासाठी थांबत नाही. सर्व शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, समाजसेवकांना शिक्षणात नवे प्रयोग काही करता येतील का, याविषयी मार्गदर्शन करावे, सूचना द्याव्यात. मुलांचे बुध्दीकौशल्य वाढवण्यासाठी काही नावीन्यपूर्ण उपक्रम करण्याची सर्वांचीच तयारी आहे. शिक्षकही तयार आहेत. शिक्षकांनीही आता वेळ वाया न घालवता त्यावर काम करावे.

शक्‍यतो मुलांच्या घरी जावून संवाद साधावा. त्यांना काही सूचना द्याव्यात. जेथे धोका नाही तेथे सर्व ती काळजी घेऊन हा प्रयोग करायला हवा.'' 
त्या म्हणाल्या, ""ऑनलाईन शिक्षणाबरोबर ज्या मुलांकडे मोबाईल नाही, त्यांना वेगळ्या पद्धतीने शिक्षण प्रवाहात ठेवले पाहिजे. ज्याच्याकडे स्क्रिनटच मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांना फोनवरून मार्गदर्शन करता येईल.'' 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image
go to top