कोयना धरणाचे दरवाजे सात फूटावर

जालिंदर सत्रे
सोमवार, 23 जुलै 2018

कोयना - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरु असुन, पाणीसाठा नियंत्रणासाठी रविवार दुपारी १२ वाजता कोयना धरणाचे दरवाजे एक फुटाने उचलण्यात आले होते. मात्र आज सकाळी ११ वाजता पुन्हा एक फुटाने उचलण्यात आले असुन, सात फुट करण्यात आले आहेत. 

पायथा वीज गृहातुन दोन हजार १०० क्युसेक्स व सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरुन ३० हजार ७०० क्युसेक असा एकुण ३२ हजार ८०० क्युसेक असा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येत आहे. 

धरणाचा एकुण पाणीसाठा ८४.२५ टीएमसी झाला असुन २८ हजार ३२० क्युसेक पाण्याची आवक प्रतिसेकंद होत आहे. सहा फुट दरवाजे असताना २८ हजार ३२० क्युसेक विसर्ग करण्यात येत होता तो दरवाजे सात फुटावर नेल्याने चार हजार ४८० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ ढाली आहे.

Web Title: The door of the Koyna dam is seven feet away