सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

"" सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य राहिल. सर्वच कामांबाबत कालबध्द कार्यक्रम राबवला जाईल. लोकसभा निवडणुक, दुष्काळी उपाययोजना याकामासह शेतकरी हिताच्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणीवर भर दिला जाईल. '' 

सांगली - जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करुन त्या प्राधान्यांने सोडवल्या जातील. आजमितीला दुष्काळ, निवडणूक आणि शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्यचा संकल्प आहे, असे मत नवे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. चौधरी यांनी आज दुपारी मावळते जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांची गेल्या दीड महिन्यांपासून बदलीची प्रतिक्षा अखेर आज संपली. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तपदावरून डॉ. चौधरी यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भुसावळ (जि. जळगाव) येथील असलेले डॉ. चौधरी भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) सन 2011 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सन 2002 मध्ये मुंबई येथील केईएम वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. 2010 ला ते भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) उत्तीर्ण झाले तर 2011 मध्येच त्यांची भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) यश मिळविले. 

पदभार स्विकारल्यानंतर डॉ. चौधरी म्हणाले,"" सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य राहिल. सर्वच कामांबाबत कालबध्द कार्यक्रम राबवला जाईल. लोकसभा निवडणुक, दुष्काळी उपाययोजना याकामासह शेतकरी हिताच्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणीवर भर दिला जाईल. '' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Abhijeet Choudhari new collector of Sangli