पुरग्रस्तांनी घरात राहायला जाण्यापूर्वी स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सांगली  जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. साथीच्या रोगाला अटकाव, पिण्याचा पाणीपुरवठा, आलेल्या मदतीसाठीचे नियोजन सुरू आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पूरग्रस्तांनी घरात राहायला जाण्यापूर्वी आपल्या घराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे, अन्यथा आपले घर पडू शकते, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज केले. 

सांगली - जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. साथीच्या रोगाला अटकाव, पिण्याचा पाणीपुरवठा, आलेल्या मदतीसाठीचे नियोजन सुरू आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पूरग्रस्तांनी घरात राहायला जाण्यापूर्वी आपल्या घराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे, अन्यथा आपले घर पडू शकते, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आज केले. 

जिल्ह्यात पूर ओसरू लागल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील बचावकार्य थांबवण्यात आले असून, आता पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू झाले आहे. स्वच्छता, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्यासाठी विद्युत पुरवठा, गॅस, एटीएममध्ये पैसे भरण्याबाबत संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. जिल्ह्यात बचावकार्यासाठी सुमारे सातशे जवानांनी चांगले काम केले. प्रशासन, महापालिकेसह स्वयंसेवी संस्थांकडून लोकांच्या मदतीचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिकेकडून मदतीचे वाटप सुरू केले आहे. मृत जनावरांची तातडीने विल्हेवाट लावली जाईल. 

० मदत मिळण्यासाठीही आमच्याकडे मागणी नोंदणी करा
० एमआरपीपेक्षा जादा दराने विक्रीबद्दल कारवाई
० तपासणीसाठी ४० लोकांची टीम
० सरकारी मदत घेतली तरीही व्यापाऱ्यांना विमा मिळणार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Abhijeet Choudhari suggestion to Flood affected peoples