डॉ. आंबेडकरांचे विचार तुमचा उद्धार करू शकतात : चरणसिंग टाक

Dr Ambedkars thoughts can save you says Taak
Dr Ambedkars thoughts can save you says Taak

सोलापूर : गटा-तटात विभागलेले नेते आणि 36 कोटी देव तुमचा उद्धार करू शकत नाहीत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करा, तेच तुमचा उद्धार करू शकतात, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे उद्घाटक सफाई कर्मचारी संघटना-मुंंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे 14 जुलै रोजी सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत पार पडले. या संमेलाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष आणि समता सैनिक दल, नागपूरचे राष्ट्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला सफाई कर्मचारी संघटना-मुंंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. 

उपस्थितांच्या हस्ते महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, दादाराव लहाणे, प्रा. एम. आर. कांबळे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, सुबोध वाघमोडे, डॉ. औदुंबर मस्के आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना उद्घाटक चरणसिंग टाक म्हणाले, गांधींजींनी अस्पृशांचा कधीच विचार केला नाही. मार्क्सवादीही दुसर्‍या देशातून येथे आले. आणि त्यांनी इथले अनेक उद्योग बंद पाडले. त्यांना आपण हद्दपार केले पाहिजे. तसेच यापुढे आपल्या विकासाचा जे विचार करतील, त्यांचाच आपण विचार करू. आपल्यातील बरेच नेतेमंडळी गटा-तटात विभागले गेले आहेत. त्यांचा फायदा समाजाला होत नाही. त्यांनी समाजाचा विचार करावा.

संमेलनाध्यक्ष विमलसूर्य चिमणकर म्हणाले, सोलापूरात जे विचार संमेलन होत आहे. ते यापूर्वी कधीच झाले नाही. यापुढे विचार आत्मसात करा. लायक अनुयायी मिळाले नाहीत तर विचार मरून जातात. तसेच आपली धम्म चळवळ कुठे चालली आहे, याचा विचार करा.

नागपूरात आपण व्यासपीठावर राजकीय नेते बोलावतो. पुढारी आणतो. त्यामुळे ज्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी क्रांती केली. ज्यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी गावाबाहेरच्या लोकांना गावात आणले. त्या बाबासाहेबांचे विचार आचरणात आणा.

तसेच आंबेडकरवादाचा अभ्यास करावा लागेल. तरच मार्क्सवाद संपवता येईल. संमेलनाचे सूत्रसंचालन सुधीर कांबळे यांनी केले. आभार प्रशांत गायकवाड यांनी मानले.

वाल्मिकी समाजात आंबेडकरांचे विचार...

यापूर्वी वाल्मिकी समाजाकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. वाल्मिकी समाजाचा समुदाय 20 राज्यात आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्या-त्या ठिकाणी जाऊन आम्ही ‘जय भीम’चा नारा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पसरवत असल्याचे उद्घाटक चरणसिंग टाक यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com