Video : डॉ. अमोल कोल्हेंची शिवस्वराज्य यात्रा नगरमध्ये दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

-  शिवनेरीपासून काल (मंगळवारी) निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा आज नगरमध्ये दाखल झाली.

- पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तिचे जल्लोषात स्वागत केले.

नगर : शिवनेरीपासून काल (मंगळवारी) निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा आज नगरमध्ये दाखल झाली. पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तिचे जल्लोषात स्वागत केले.

सकाळी 11 वाजता माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन पायी रॅली काढण्यात आली. पक्षाचे नेते तसच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, अंकुश काकडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.

माळीवाडा वेशीतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातून निघालेल्या या रॅलीत शक्‍तीप्रदर्शन करण्यात आले. विशाल गणपतीची मान्यवरांनी आरती केली. पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, चितळे रस्ता मार्गे ही रॅली चौपाटी कारंजा येथे जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol Kolhe Shivswarajya yatra entres the city