जीवनदायिनी नद्या जीव घेऊ लागल्या - डॉ. अवचट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - जीवनदायिनी ठरलेल्या आणि कितीही मोठे महापूर पचवणाऱ्या नद्याच आता लोकांचे जीव घेऊ लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आपल्या चुकांबाबत अंतर्मुख होऊन आता नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केले. 

येथील नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. दरम्यान, आजपासून महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ झाला. यानिमित्ताने शाहू स्मारक भवनाची पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने सजावट केली असून, ती पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. 

डॉ. अवचट यांच्याशी उदय गायकवाड यांनी संवाद साधला. जवळून अनुभवलेले पंचगंगा प्रदूषण, प्लास्टिकच्या कचऱ्याने तुंबलेले जयंती व दुधाळी नाले, नगरसेवकांकडून आलेले अनुभव डॉ. अवचट यांनी शेअर केले, मात्र पंचगंगा प्रदूषणावर लेख प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदूषणमुक्तीच्या लढ्याला बळ आल्याचेही समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. पंचगंगेपासून ते गंगा-यमुनेपर्यंत आणि धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍नांपासून ते जंगलांच्या ऱ्हासापर्यंत विविध गोष्टींवर त्यांनी तितक्‍याच परखडपणे भाष्य केले.

संयोजन समितीचे उपाध्यक्ष कृष्णा गावडे यांनी स्वागत केले. महोत्सव संचालक वीरेंद्र चित्राव यांनी महोत्सवाचा उद्देश सांगितला. ‘किर्लोस्कर’चे मार्केटिंग व्हाईस प्रेसीडेंट संजीव निमकर यांनी समूहाच्या पर्यावरणीय कामांची माहिती दिली. महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रहास रानडे, राहुल पवार, ॲड. केदार मुनीश्‍वर, अजय दळवी आदी उपस्थित होते. उदय गायकवाड, ऋतू काशीद यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Dr Anil Avchat comment