कष्टकरी स्वतः साठीचा जाहिरानामा स्वतः तयार करून जाब विचारणार - डॉ. बाबा आढाव

कष्टकरी स्वतः साठीचा जाहिरानामा स्वतः तयार करून जाब विचारणार  - डॉ. बाबा आढाव

कोल्हापूर - कोट्यावधी रूपये कष्टकऱ्यांकडून घेतले पण त्यांच्यासाठी ठोस असे कांही केले नाही. निवडणूकीवेळी जाहिरनाम्यात केलेल्या घोषणाही फसव्या निघाल्या, योजनांचे लाभ खऱ्या कष्टकऱ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीसाठी कष्टकरी स्वतः साठीचा जाहिरानामा स्वतः तयार करतील तो निवडणूक लढविणाऱ्या पक्षांना देतील आमच काय करताय बोला असा प्रश्‍न सत्ताधारी विरोधकांना आम्ही संघटीत बळावर विचारणार आहोत, असा इशारा कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढावा यांनी दिला. 

कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतीच्या मेळाव्यासाठी डॉ. आढाव कोल्हापूरात आले असता सकाळने त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. 

श्री. आढाव म्हणाले की, "" जागतिकीकरण, उदारिकरणानंतर ठरावीक वर्ग विशेषतः उद्योजकांना सवलती देण्यापासून ते त्यांचे भले करण्याचे प्रयत्न झाले याच काळात असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्याही वाढली, जे घटक संघटीत नाहीत पण उदरनिर्वाहासाठी कांही काम करतात रोजगार करतात. त्यांना बळ देण्याचे काम ज्या गांभिर्याने व्हायला हवे होते ते अद्याप झालेले नाही. त्यामुळे सरकार कांही देत नाही. रोजगारातून फारसे कांही मिळत नाही अशा दुहेरी कात्रीत असंघटीत कामगार कष्ठकरी वर्ग सापडला आहे त्याची अवस्था परित्यक्‍त्यांसारखी झाली आहे.'' 

ते पुढे म्हणाले की, "" विविध क्षेत्रात खासगी क्षेत्रात कामगार काम करतात रिक्षा चालक, माथाडी कामगार, बांधकाम मजूर, मोलमजूरी करणाऱ्या महिला त्यांच्याकडून विविध कर रूपात हजारो रूपये सरकारकडे जमा झाले आहेत. शासकीय निमशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अवघा अडीच टक्के नोकरदार वर्ग संघटीत आहे. बाकी खासगी क्षेत्रात विविध सेवा क्षेत्रात काम करणारे घटक असंघटीत आहेत असे घटक एकत्रीत नाहीत म्हणून त्यांच्या मागण्या विषयी फारशा गांभिर्याने घेतले जात नाही. सरकार उद्योजकांसाठी योजना बनवते सवलतीचा लाभ देते. मात्र कष्टकरी वर्गासाठी तितक्‍या गांभिर्याने कांही करीत नाहीत.'' 

ही सर्व पार्श्‍वभूमी विचारात घेऊन आत कोणत्या पक्षावरच्या जाहिरनाम्यांवर आम्ही अवलंबून रहाणार नाही आमचे जगणे सुसह्य करणार जाहिरनामा आम्ही तयार करून त्यात विमा संरक्षणापासून ते मजूरीचा भाव वाढवून देण्या पर्यंतच्या मागण्या असतील त्या जाहिरनाम्याची परिपूर्तता करण्याची खात्री जो पक्ष आम्हाला देईल त्याच्यापाठीशी राहू असेही डॉ. आढाव यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com