विधायक उपक्रमांमधून बाबासाहेबांना अभिवादन 

परशुराम कोकणे
बुधवार, 11 एप्रिल 2018

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला 14 एप्रिलपासून सुरवात होत आहे. जयंती उत्सवामध्ये विधायक उपक्रम राबविण्यासाठी सोलापुरातील तरुण कार्यकर्ते उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाने यंदा पुस्तके, वही आणि पेन विद्यादान म्हणून स्वीकारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मध्यवर्तीसह विविध मंडळे, संस्थांकडून विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्या विषयी जाणून घेऊया... 

पुस्तक, वही, पेन संकलन 
विहार तिथे ग्रंथालय ही संकल्पना घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाकडून बाबासाहेबांवर आधारित, तसेच महापुरुषांविषयी, प्रेरणादायी पुस्तके जयंती उत्सव काळात विद्यादान म्हणून स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच एक वही, एक पेन देऊनही सोलापूरकरांनी बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9970507641 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

एक पुस्तक द्या, एक पुस्तक न्या... 
अपरिचित संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक पुस्तक द्या, एक पुस्तक न्या... हा उपक्रम हाती घेतला आहे. बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात 13 एप्रिलपासून हा उपक्रम राबविणार असल्याचे मयूर गवते यांनी सांगितले आहे. अधिक माहितीसाठी 9975486005 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नालंदानगरात महिलांना प्रोत्साहन 
विजापूर रोड परिसरातील नालंदानगर बुद्धविहार बहुउद्देशीय संस्थेच्या उत्सव मंडळावर यंदा महिलांना संधी देण्यात आली आहे. महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ज्येष्ठ पदाधिकारी अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी माया लोंढे, उपाध्यक्ष- आम्रपाली गाडे, सचिवा - जयश्री नडगिरी, सहसचिवा- सुनंदा शाक्‍य, खजिनदार- वंदना कदम, कार्यकारिणी सदस्य- सुशीलादेवी भालशंकर, सुरेखा वाघमारे, रुक्‍मिणी खंडागळे, दैवशाला कांबळे, अंजली साबळे, मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे आदींची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व महिला उच्च विद्याविभूषित आहेत. 

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आचरणात आणण्यासाठी यंदा आम्ही मध्यवर्ती उत्सव मंडळाकडून पुस्तकांसोबतच वही आणि पेन संकलनाचा उपक्रम राबविणार आहोत. या उपक्रमासाठी जुनी किंवा नवीन पुस्तकेही देता येतील. 
- सत्यजित वाघमोडे, अध्यक्ष, मध्यवर्ती उत्सव मंडळ

Web Title: dr. babasaheb ambedkar event