प्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली 

प्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली 

सोलापूर : "घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', "भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', "जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याचरणी नतमस्तक होऊन आज शुक्रवारी कृतज्ञता व्यक्त केली. 

विविध मान्यवरांनी केले अभिवादन 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पार्क चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी पहाटेपासून शहर-जिल्ह्यातून मोठी गर्दी झाली होती. शुभ्र वस्त्र परिधान करून रांगेत उभे राहून सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करीत होते. सकाळी नूतन महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम, उपमहापौर राजेश काळे, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, राजाभाऊ इंगळे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगोंडे आदींनी डॉ. बाबासाहेबांच्या चरणी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. 

सोलापूर महापालिका 
सोलापूर महापालिकेच्या वतीने महापौर श्रीकांचना यन्नम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विनोद भोसले, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिकेचे उपायुक्त अजयसिंह पवार उपस्थित होते. 

शहर कॉंग्रेस समिती 
सोलापूर शहर कॉंग्रेस समितीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी महापौर आरीफ शेख, नलिनी चंदेले, अलका राठोड, सुशीला आबुटे, स्थायी समितीचे माजी सभापती मधुकर आठवले, बाबा मिस्त्री, शिवलिंग कांबळे, लतीफ मल्लाबादकर, 

जांबमुनी मोची समाज सेवा 
जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ (शहर जिल्हा ) वतीने महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष देंवेद्र भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी जांबमुनी मोची समाज मध्यवर्ती रथोत्सवचे अध्यक्ष राजु निलगंटी युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष बाबा करगुळे युवक संघटना अध्यक्ष यल्लप्पा तुपदोळकर माजी अध्यक्ष बसवराज म्हेत्रे मारुती माळगे हणमंतु सायबोळु अंबादास नाटेकर नागेश म्हेत्रे, मोहन डांगे, शिवराय साखरे अमित माढेकर वेदमुर्ती म्हेत्रे उमेश निलगंटी आदी उपस्थित होते 

समता सैनिक दलातर्फे सलामी 
समता सैनिक दलातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली. तसेच दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलातील कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते. महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. 

आंबेडकरी साहित्याची दालने 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले मुक्ती कोण पथे?, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, शूद्र पूर्वी कोण होते?, क्रांती आणि प्रतिक्रांती यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित विविध साहित्यांची दालने पार्क चौकात थाटण्यात आली होती. तसेच डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा, बिल्ले, निळे झेंडे, मफलर, गौतम बुद्धांच्या प्रतिमा आदी आंबेडकरी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर फुलांची विक्रीही केली जात होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com