टेंभूच्या पाणी वाटपावरून आमदार बाबर यांच्याकडून राजकारण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

आटपाडी - तालुक्यातील अंशतः आणि पूर्णतः वगळलेल्या वंचित गावांना समन्यायी प्रकल्पामुळे पाणी देण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. तरीही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार अनिल बाबर व अन्य लोकप्रतिनिधी दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. आमदार आणि इतर नेतेमंडळीनी वंचित गावावरून दिशाभूल करण्याचा प्रकार थांबविण्याचे आवाहन श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत केले.

श्रमिक मुक्ती दलाने पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते यावेळी आनंदराव पाटील, भारत पाटील, अशोक लवटे उपस्थित होते. डॉ. पाटणकर यांनी टेंभूच्या विषयावरून राजकारण करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.

ते म्हणाले,'22 जून 2016 रोजी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांसोबत बैठक झाली. बैठकीत समन्यायी प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आटपाडी आणि तासगाव तालुक्यातील फेरआखणी होऊन एक ही शेतकरी पाण्यापासून वंचित राहीलेला नाही. समन्यायी वाटपामुळे वंचित गावे आणि वगळलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे. त्याचा आराखडा, अंदाजपत्रक, नकाशे आदी तयार केले आहे. असे असताना आमदार अनिल बाबर वंचित गावचा समावेश करण्यावरून दिशाभूल करणारी वक्तव्य करीत आहेत. पाणी शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न असताना केवळ राजकीय फायदा आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेतेमंडळीनी चुकीचे वक्तव्य करीत आहेत.'

Web Title: Dr Bharat Patankar comment