माचीगड-अनगडी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयसिंग पवार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

खानापूर - माचीगड-अनगडी (ता. खानापूर) येथील श्री सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीतर्फे रविवारी (ता. 30) 22 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक व साहित्यिक डॉ. जयसिंग पवार यांची निवड केली आहे.

खानापूर - माचीगड-अनगडी (ता. खानापूर) येथील श्री सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीतर्फे रविवारी (ता. 30) 22 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक व साहित्यिक डॉ. जयसिंग पवार यांची निवड केली आहे. माचीगड प्राथमिक शाळेसमोरील (कै) रामचंद्र पाटील साहित्यनगरीत चार सत्रात हे संमेलन होणार आहे. 

डॉ. पवार हे मूळचे तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील असून त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम. ए., पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी तीन दशकाहून अधिक काळ महाविद्यालयात अध्यापन केले. ते इतिहास संशोधक असून अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक, शाहू संशोधन केंद्र कोल्हापूरचे संचालक आहेत. त्यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची स्थापना केली आहे. त्यांची छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, राजर्षी शाहू : एक दृष्टीक्षेप, मराठी समाजाचा उदय आणि अस्त, या ग्रंथांना पुरस्कार मिळाले आहेत. बारावी अभ्यासक्रमातील मराठी विषयात "राजर्षी शाहू छत्रपती : जीवन आणि कार्य' या ग्रंथातील "शिक्षण हाच आमचा तरणोपाय' या पाठाचा समावेश आहे. 

Web Title: Dr Jaysinghrao Pawar as President of Machigad Marathi Sahitya Samelan