ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते डॉ. मधू आपटे यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते डॉ. मधू आपटे यांचे निधन

सांगली - येथील ज्येष्ठ रंगकर्मी व चित्रपट अभिनेते डॉ. मधुकर ऊर्फ मधू आपटे (वय ८२) यांचे  पुणे येथे निधन झाले. नाट्यपंढरीत ते लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि नेपथ्य रचना या सर्व विभागांत ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते.  सोमवारी (ता.१३) सांगलीत भावे नाट्यमंदिरात सायंकाळी साडेसातला शोकसभा होणार आहे.

सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यमंदिराची निर्मिती असलेल्या ३५ नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. हौशी नाटककार म्हणून लिहिलेल्या पाठलाग,  एक हवाय न्यायाधीश, प्यादी झाली फर्जंद, सारेगम..गप गपरे, एका पाटाची कहाणी ही नाटके राज्य स्पर्धेत सादर झाली. आकाशवाणीचे ते बी-हाय ग्रेड कलावंत होते. सांगली आकाशवाणीच्या ७५ हून अधिक नभोनाट्यात त्यांनी सहभाग घेतला. ३० हून अधिक रंगकर्मींच्या मुलाखती घेतल्या. विद्यापीठाच्या नाट्यविभागात २० वर्षे व्याख्याता होते. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे ते माजी सदस्य होते.

नाट्यपरिषद सांगली शाखेत विविध पदांवर काम केले. काकासाहेब खाडिलकर जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरविले होते. डॉ. आपटे यांनी ‘कळतय पण वळत  नाही’, ‘दागिना’, ‘सर्वश्रेष्ठ’, ‘धडकमार’, ‘ठोशास ठोसा’, ‘पाटलीण’, ‘शोध’, ‘ताईचं लग्न’, ‘सौभाग्य’, ‘ठिणगी’, ‘पुत्रवती’, ‘संसार हेच माहेर’, ‘प्रेमसाक्षी’, ‘भिऊ नकोस मी उभा आहे पाठीशी’ या चित्रपटात 
भूमिका केल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com