डॉ. एन. डी. पाटील यांची मोटार चोरीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

रुईकर कॉलनीतील प्रकार; टोळीचे कृत्य; पोलिस यंत्रणेकडून शोध सुरू

कोल्हापूर: ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारात लावलेली मोटार मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली. आज (मंगळवार) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिस यंत्रणेने सीसी टीव्हीसह विविध पथकाद्वारे चोरट्यांचा शोध सुरू केला. सीसी टीव्हीतील चित्रीकरणाद्वारे हे कृत्य तीन ते चार चोरट्यांच्या टोळीने केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, रुईकर कॉलनीत डॉ. एन. डी. पाटील यांचा बंगला आहे. त्यांची "सिल्की गोल्ड' रंगाची (एमएच-09-बीएक्‍स्‌ -6929) मोटार आहे. ती गेली पाच वर्षे ते वापरत आहेत. सध्या त्यांच्या बंगल्याच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांची मोटार काली रात्री दारातच रस्त्यावर लावली होती. मध्यरात्री 2.10 ला एक मोटारीतून चोरटे त्यांच्या दारात आले. त्यांनी काहीवेळ बॅटरीच्या सहायाने तेथे टेहाळणी केली. त्यानंतर ते निघून गेले. अडीचच्या सुमारास चोरटे पुन्हा गाडीतून बंगल्या जवळ आले. दोघे जण गाडीतून खाली उतरले. त्यातील एकाने पाटील यांच्या मोटारीच्या दरवाच्याचे लॉक तोडून काढले. त्यानंतर पुन्हा ते दोघे आपल्या गाडीत बसून तेथून निघून गेले. अखेरीस तीन वाजून एक मिनीटानी चोरट्याची गाडी परत पाटील यांच्या बगल्या समोर आली. त्यातून पुन्हा दोघे चोरटे खाली उतरले. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी मोटार सुरू केली. त्यातील एक चोरटा पुन्हा आपल्या गाडीत येऊन बसला. मोटारीत बसलेल्या चोरट्याने 3 वाजून 3 मिनीटे आणि 57 सेकंदाला पाटील यांची गाडी सुरू केली. काही अंतर त्यांने मोटार मागे घेतली. त्यानंतर तो तेथून मोटारीसह निघून गेला. त्यापाठोपाठ चोरट्यांची मोटार निघून गेली.

Web Title: dr. n. d. Patil car stolen