शिवसेना पक्षप्रमुखाच्या भेटीबाबत डॉ. नंदिनी बाभुळकर म्हणाल्या....  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

चंदगड - उमेदवारीच्या मुद्द्यावरून मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डाॅ. नंदिनी बाभुळकर यांनी भेट घेतल्याचे वृत्त आज सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. याबाबत डाॅ. बाभुळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, अलीकडच्या काळात मी शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतली नाही,

डाॅ. बाभुळकर म्हणाल्या, सन 2014 मध्ये एव्हीएच प्रकल्पाच्या विरोधात उभारलेल्या जल जनआंदोलन लढ्याला पाठिंबा द्यावा यासाठी आई आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्यासह ठाकरे यांना भेटलो होतो. त्यानंतर आज अखेर त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची भेट किंवा चर्चा झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधीत बातमी

Vidhan Sabha 2019 : डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या मार्गात काटेच अधिक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Nandini Babhulkar comment on meeting with uddhav thackeray