मिरजेतील डॉ. यशवंत तोरो यांच्या पुस्तकास डाॅ. रानडे पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मिरज - येथील सिद्धिविनायक गणपती कर्करोग इस्पितळाचे प्रशासकीय संचालक डॉ यशवंत तोरो यांना महाराष्ट्र साहीत्य परिषदेने डॉ. विलास रानडे स्मृती पुरस्काराने सन्मानित केले.

मिरज - येथील सिद्धिविनायक गणपती कर्करोग इस्पितळाचे प्रशासकीय संचालक डॉ यशवंत तोरो यांना महाराष्ट्र साहीत्य परिषदेने डॉ. विलास रानडे स्मृती पुरस्काराने सन्मानित केले.

तोरो यांच्या "कॅन्सर - निदान, उपचार आणि प्रतिबंध" या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे त्याचे स्वरुप आहे. या पुस्तकात कर्करोगाविषयी इत्यंभुत शास्त्रीय आणि वैद्यकीय माहीती दिली आहे. त्याला यापुर्वीही वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. 

कर्करोग उपचार क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यानंतर आलेल्या अनुभवातून पुस्तक साकारले आहे. या पुस्तकाने रुग्णांच्या वेदना थोड्या जरी कमी केल्या तरी पुस्तकाची फलनिष्पत्ती झाली असे मी म्हणेन.

-  डॉ यशवंत तोरो

राष्ट्रीय आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ अभिजीत वैद्य यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी ते म्हणाले, देशाला बुलेट ट्रेन हवी कि चांगल्या दर्जाची सार्वजनिक आरोग्य सेवा याचा साकल्याने विचार करण्याची वेळ आली आहे. देशातील सर्व राज्यांची आरोग्यसेवेसाठीची तरतुद दोन लाख कोटी रुपये आहे. या स्थितीत बुलेट ट्रेनवर किती खर्च करायचा हे ठरवले पाहीजे. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, परिक्षक मनोज देशपांडे आदी उपस्थित होते. 

डॉ देशपांडे म्हणाले, कर्करोगाविषयी शास्त्रशुद्ध माहीती देणाऱ्या या पुस्तकामुळे सर्वसामान्यांचे गैरसमज दूर होतील. वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले. 

Web Title: Dr Vilas Rande award to Dr Toro books